अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला; मुंबईतून पुरवण्यात आले पैसे; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 15, 2021 | 19:36 IST

Nawab Malik on Amaravati riots :अमरावतीमध्ये (Amravati) झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे (BJP leader, former minister Anil Bonde) हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री (Nationalist Congress Party leader and Minister of State) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला.

BJP's Anil Bonde plotted Amravati riots -Nawab Malik
अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • काही दिवसांपूर्वी मालेगाव, अमरावती, नांदेड येथे त्रिपुरातील कथित हिंसाचाराप्रकरणी मुस्लिम समुदायाकडून मोर्चे काढण्यात आले.
  • अमरावती बंददरम्यान भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार झाल्याचा आरोप.
  • अमरावतीमधील दंगलीसाठी मुंबईतील आमदाराने पैसे पुरवले असल्याचा धक्कादायक आरोपही मलिक यांनी केला आहे.

Nawab Malik on Amaravati riots :मुंबई :  अमरावतीमध्ये (Amravati) झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे (BJP leader, former minister Anil Bonde) हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री (Nationalist Congress Party leader and Minister of State) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. अमरावतीमध्ये हिंसाचार (Violence) घडवून आणण्यासाठी काही तरुणांना पैसे वाटण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही मलिकही यांनी केला. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाहीत. त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले. 

काही दिवसांपूर्वी मालेगाव, अमरावती, नांदेड येथे त्रिपुरातील कथित हिंसाचाराप्रकरणी मुस्लिम समुदायाकडून मोर्चे काढण्यात आले. या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला. या हिंसाचाराच्या विरोधात भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले. या बंद दरम्यान भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार झाल्याचा आरोप करण्यात येत होता.  अमरावतीमधील दंगलीसाठी मुंबईतील आमदाराने पैसे पुरवले असल्याचा धक्कादायक आरोपही मलिक यांनी केला आहे.  अमरावती येथील हिंसाचार हा दोन गटात झाला नाही. त्याशिवाय या हिंसाचाराचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही, त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे मलिक यांनी म्हटले. मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नगरसेवक हा एमआयएमचा असून राष्ट्रवादीचा नसल्याचे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले.

दंगलीसाठी मुंबईतून अमरावतीत पैसे?

अमरावती दंगलीच्या आधी मुंबईतून भाजपच्या आमदाराने अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवले होते. त्याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून विविध मार्गांचा अवलंब करण्यात आला. मात्र, या सगळ्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर भाजपने दंगलीचे अस्त्र काढले असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.दरम्यान, अमरावतीमध्ये दंगली झाल्याप्रकरणी माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना अटक करण्यात आली आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली आहे. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी