MHADA Lottery: म्हाडा घरांच्या लॉटरीतील वास्तव्याची अट रद्द करण्याची भाजपची मागणी

मुंबई
भरत जाधव
Updated Feb 19, 2023 | 17:38 IST

म्हाडा घरांच्या सोडतमधील 15 वर्षांची वास्तव्याची असलेली अट मराठी माणसांसाठी रद्द करावी, अशी मागणी भाजपचे वांद्रे पुर्व (Bandra East)विधानसभा सरचिटणीस  (Assembly Secretary General) प्रविण घाडगे ( Pravin Ghadge) यांनी म्हाडाचे उपाध्यक्षांकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे. 

Abolish residency condition of MHADA housing lottery- BJP
MHADA घरांच्या लॉटरीतील वास्तव्याची अट रद्द करा- BJP   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • म्हाडाने अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी एकदाच कायमची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली.
  • म्हाडा घरांच्या सोडतमधील 15 वर्षांची वास्तव्याची असलेली अट मराठी माणसांसाठी रद्द करावी
  • भाजपचे वांद्रे पुर्व विधानसभा सरचिटणीस प्रविण घाडगे यांनी मागणी केली आहे.

मुंबई  :  भाजपने (BJP)राज्यातील आगामी निवडणुकीसाठी (election) तयारी सुरू केली आहे. मुंबईतील (Mumbai) नागरिकांच्या हक्कासाठी आणि समस्यांचा मुद्दा उपस्थित करत आहे. या प्रचारात भाजपने म्हाडातील (mhada)अटीचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय पटलावर आणला आहे. म्हाडा घरांच्या सोडतमधील 15 वर्षांची वास्तव्याची असलेली अट मराठी माणसांसाठी रद्द करावी, अशी मागणी भाजपचे वांद्रे पुर्व (Bandra East)विधानसभा सरचिटणीस  (Assembly Secretary General) प्रविण घाडगे ( Pravin Ghadge) यांनी म्हाडाचे उपाध्यक्षांकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे.  (BJP's demand to cancel the residence condition in the MHADA house lottery)

अधिक वाचा  : IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय

म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळ व मुंबई  मंडळ यांच्याकडून शहर आणि ग्रामिण  भागासाठी घरांच्या लॉटरी काढल्या डातात. लॉटरीत विजेता ठरणाऱ्या प्रत्येक अर्जदारांकडून मुंबईसह महाराष्ट्रातील 15 वर्ष  वास्तव्य असलेला दाखला घेतला जातो. याच मुद्द्यावरुन भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने प्रश्न उपस्थित ही अट काढून टाकण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या मराठी माणसांकडून म्हाडाने 15 वर्षांचा  अधिवास दाखला मागू नये, मराठी  माणसांना या अटीतून  वगळण्यात यावे असे भाजपाचे घाडगे यांनी म्हाडाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.  

बारकोड असलेल्या डोमेसाईलमुळे नागरिकांची तारांबळ 

ऑनलाईन अर्ज भरताना म्हाडाने बारकोड असलेल्या डोमेसाईल प्रमाणपत्राची अट ठेवल्यामुळे पूर्वीचे डोमेसाइल बाद ठरले असून लोकांची फारच तारांबळ उडत आहे. आता अर्ज करायचा असेल तर नव्याने डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदी घोडे नाचवावे लागणार आहेत. त्यामुळे एक खडकी योजना आणि सेवा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. अनेकांनी तात्काळ सर्टिफिकेटसाठी एजंटचा मार्ग निवडल्याने विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे. 

अधिक वाचा  : Maha Agri Admission 2023:कसा करणार अर्ज जाणून घ्या

दरम्यान, अर्जदारांना अर्ज भरतानाच फोटो, ई-स्वाक्षरी, शपथपत्र, डोमेसाईल, स्वीकृती पत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार, पॅन कार्ड आदी सात कागदपत्रे अपलोड करावी लागत आहेत. ही कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची तक्रार देखील नागरिकांनी केली आहे.   

अधिक वाचा  :  चंद्राची पाहून अदा अनेक सर्जेराव फिदा

दरम्यान, म्हाडाची लॉटरी 2023 चा भाग म्हणून म्हाडाची कोकण शाखा 2,046  युनिट्स देणार आहे. ही घरे ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई आणि वेंगुर्ला येथे उपलब्ध असतील असे एफपीजी अहवालाट नमूद केले आहे. 2,046 युनिट्सपैकी 1001  युनिट्स इ डब्ल्यूएस श्रेणीमध्ये, 1,023 युनिट्स एलआयजी श्रेणीमध्ये, 18 युनिट एमआयजी श्रेणीमध्ये आणि 4 युनिट एचआयजी श्रेणीमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.

सोडत कधी जाहीर होणार?

कोकण मंडळाकडून 4752 घरांसाठी सोडतीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, 20 फेब्रुवारी 2023 पासून अर्जविक्री आणि स्वीकृती सुरू होणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 मार्च असणार आहे. तर लॉटरीची सोडत 11 एप्रिल रोजी होणार आहे. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ही सोडत काढण्यात येईल. या संदर्भातील वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

अधिक वाचा  : 

Important dates for MHADA Lottery 2023:  

  • अर्जाची नोंदणी - 5 जानेवारी 2023 पासून सुरू
  • अर्ज विक्री - 20 फेब्रुवारी 2023 पासून
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2023
  • स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी जाहीर - 5 एप्रिल 2023 
  • सोडत कधी जाहीर होणार - 11 एप्रिल 2023

म्हाडा लॉटरी २०२३: नवीन म्हाडा लॉटरी प्रणाली अंतर्गत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • मोबाइल नंबर -

आधार कार्डला ओटीपी म्हणून जोडलेला मोबाइल नंबर आणि लॉटरीशी संबंधित सर्व माहिती तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस म्हणून पाठवली जाईल. ओटीपी म्हणून नोंदणीकृत ईमेल आयडी आणि लॉटरी संबंधित सर्व माहिती नोंदणीकृत ईमेल खात्यावर ईमेल म्हणून पाठविली जाईल.

  • आधार कार्ड:

नोंदणीच्या वेळी आधार कार्डाच्या पुढील बाजूची आणि मागील बाजूची स्पष्ट प्रतिमा अपलोड करावी लागेल. विवाहित असल्यास, जोडीदाराचे आधार कार्ड देखील अपलोड करावे लागेल.

  • पॅन कार्ड:

नोंदणीच्या वेळी पॅन कार्डची स्पष्ट वाचन्याजोगी प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. विवाहित असल्यास, जोडीदाराचे पॅनकार्ड देखील अपलोड करावे लागेल.

  • अधिवास प्रमाणपत्र:

अधिवास प्रमाणपत्र मागील 5 वर्षांत (जानेवारी 2018नंतर) लागू केलेले असावे आणि महाऑनलाइन/महाआयटी बारकोड असणे आवश्यक आहे. अधिवास प्रमाणपत्र नसताना, आपल सरकार किंवा जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर अर्ज करा आणि नोंदणी फॉर्मवर अर्जाचा आयडी/ क्रमांक टाका आणि तुम्ही म्हाडा लॉटरी नोंदणी प्रक्रियेत पुढे जाऊ शकता. तुम्ही जिंकल्यास, म्हाडाच्या युनिटचा ताबा घेण्यापूर्वी तुम्ही अधिवास प्रमाणपत्र द्याल या अटीच्या अधीन आहे.

अधिक वाचा  : मराठमोळा शिव ठाकरे या गोष्टींमुळे राहिला दुसऱ्या स्थानावर

  • आयटीआर

(स्वतः): आयटीआर निवडा आणि एफवाय  2021-22 ची आयटीआर पावती अपलोड करा. लक्षात ठेवा की आयटीआर पावतीच्या जागी सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 अपलोड करणे अवैध मानले जाईल. विवाहित असल्यास, जोडीदारासाठी देखील एफवाय 2021-22  ची आयटीआर पावती अपलोड करा.

अधिक वाचा  : साई काय केलं होतं बाई; वडिलांना काय आवडलं नाही

  • उत्पन्नाचा पुरावा:

उत्पन्नाचा दाखला बटण निवडा आणि तहसीलदार किंवा महा ई-सेवा केंद्राने एफवाय 2021-22 साठी प्रमाणित उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करा (त्यात महाऑनलाइन/महाआयटी बारकोड असावा).

  • जात प्रमाणपत्र:

वैध जात प्रमाणपत्र अपलोड करा
विशेष श्रेणी: वैध प्रमाणपत्र जमा करा


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी