विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपची तयारी; मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या शिंदेंची वर्णी लागण्याची शक्यता

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 16, 2022 | 11:51 IST

मंत्रिमंडळ विस्तारानंतर (Cabinet expansion) शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadnavis government) खातेवाटप झाले. खाते वाटपावरुन शिंदे गटात (Shinde group) आणि भाजपमध्ये (BJP) नाराजी दिसून येत आहे. परंतु शिंदे गटापेक्षा भाजपकडे अधिक वजनदार खाती गेली असताना भाजप आता विधानपरिषदेच्या (Legislative Council) सभापतीसाठी (Speaker) तयारी करत आहे. यात राम शिंदेंचं नाव आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदेंचं नाव आघाडीवर
Ram Shinde's name is in the forefront for the post of Speaker of the Vidhan Parishad  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राम शिंदेंना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही.
  • राज्यपाल नियुक्त १२ जणांची नियुक्ती झाल्यास विधान परिषदेत भाजपची संख्या वाढणार

मुंबई :  मंत्रिमंडळ विस्तारानंतर (Cabinet expansion) शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadnavis government) खातेवाटप झाले. खाते वाटपावरुन शिंदे गटात (Shinde group) आणि भाजपमध्ये (BJP) नाराजी दिसून येत आहे. परंतु शिंदे गटापेक्षा भाजपकडे अधिक वजनदार खाती गेली असताना भाजप आता विधानपरिषदेच्या (Legislative Council) सभापतीसाठी (Speaker) तयारी करत आहे. यात राम शिंदेंचं नाव आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या माजी मंत्री राम शिंदे (ram shinde) यांची वर्णी सभापतीपदी लागणार अशी चर्चा रंगली आहे. तसेच, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही नव्याने सादर केली जाणार आहे.

उद्या बुधवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. शिंदे सरकारचे हे पहिले पावसाळी अधिवेशन आहे. आता विधान परिषदेचा सभापती बसवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानपरिषदेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या सभागृहाच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत.

Read Also : Fifa Ban AIFF: बंदीनंतर भारतीय फुटबॉलवर काय फरक पडणार?

सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतीपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पदासाठी विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते आहे. सद्यस्थितीत विधानपरिषदेत भाजपकडे २४, तर शिवसेनेकडे ११ आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी ११ जागा आहेत. तसेच १६ जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त १२ जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा जास्त होईल आणि भाजपला विधान परिषदेतही बहुमत सिद्ध करता येईल.

Read Also : बिलकिस बानो बलात्कार प्रकरणी सर्व आरोपींची मुक्तता

दरम्यान उद्यापासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता शिंदे सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे उपस्थित नसतील. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा 17 ऑगस्टपासूनच सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यातल्या दोन ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तुलनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कमी खाती देण्यात आली आहेत. गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहे. ही ही खाते अधिक मलाईदार असल्यानं शिंदे गटात नाराजी आहे. या खातेवाटपानंतर शिंदे गटामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी