Brihanmumbai Municipal Corporation Budget 2023 : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे 2023-24 चा आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या (Election)तोंडावर कोणत्या घोषणा यात केल्या जातात याची उत्सुकता आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं आकारमान 50 हजार कोटी रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. (Budget of Mumbai Municipal Corporation today, attention will be given to these projects)
अधिक वाचा : लाईफस्टाईलमध्ये फाॅलो करा 'या' टिप्स, कधीच होणार नाही कॅन्सर
हा अर्थसंकल्प (Budget)मुंबई महानगरपालिकेचे (Mumbai Municipal Corporation) इक्बाल सिंह चहल(Iqbal Singh Chahal) अर्थसंकल्प सादर करतील. देशातील सर्वात आयुक्त (Commissioner) बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासक अंदाजपत्रक मांडणार आहेत. हा अर्थसंकल्प आगामी निवडणुकीआधी सादर केला जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष असे महत्त्व आहे. या अर्थसंकल्पात राजकीय नेत्यांबरोबर सामान्य नागरिकांना बरीच अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पात नवे कर किंवा करवाढीचा बोझा लादला जाऊ नये, हीच सर्वसामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे.
अधिक वाचा : जागतिक कॅन्सर दिवसाचे कोट्स
दरम्यान, यावर्षी पालिकेची आणि नगरसेवकांची मुदत संपलेली असल्यामुळे तसंच निवडणूक अजून झालेली नसल्याने अर्थसंकल्प प्रशासकीय पातळीवरच जाहीर होईल. यावर्षी अतिरिक्त मनपा आयुक्त अश्विनी भिडे या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प प्रशासक इकबालसिंह चहल यांना सादर करतील. त्यानंतर अतिरिक्त मनपा आयुक्त वेलरासू हे मनपाचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर करतील. गेल्यावर्षी 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यात यावर्षी भर पडण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावेळी वेगळ्या विदर्भासाठी घोषणा
मुंबई महापालिका अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभिकरण प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य योजनांवर भर देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आगामी महापलिका बजेट हे निवडणूकपूर्व अंदाजपत्रक असल्याने त्यात शिक्षण, आरोग्य, मूलभूत पायाभूत सुविधा, रस्ते यासाठी भरभक्कम तरतूद केली जाईल, असा दावा शिंदेगट आणि भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
अधिक वाचा : राज्यातील रेल्वे प्रकल्पांना अर्थमंत्र्यांकडून निधीची गती
शिक्षणासाठी विशेष तरतूद करून बीएमसी शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, मुंबई पब्लिक स्कूलची मागणी पाहता त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सुशोभीकरणासोबतच दळणवळण, पायाभूत सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण याबाबतीत सामान्य मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून असेल.
यासह रस्ते काँक्रीटीकरण, सागरी किनारा मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प, समुद्राचे पाणी गोडे करणे, आरोग्य यंत्रणेसाठी भरीव तरतूद करून विकासकामांना चालना देण्याचा प्रयत्न यात केला जाणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.