Uddhav Thackeray reaction on upcoming municipal corporation Election: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेनंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच आज विधानभवनाच्या परिसरात उद्धव ठाकरे यांची एन्ट्री झाली. (BMC election 2022 will Maha Vikas Agahdi will fight municipal corporation election together Uddhav Thackeray gives this answer)
आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर प्रथमच उद्धव ठाकरे हे विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत विधीमंडळाच्या आवारात आयोजित बैठकीत सहभाग घेतला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्यापही ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे विधानभवनाच्या आवारात त्यांना येण्यास मुभा आहे.
अधिक वाचा : राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, पाहा यादी
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यावर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, महाविकास आघाडी सरकारने त्यावेळी कोरोनाचा सामना केला. त्या संकटाचा मुकाबला केला तर हे संकट काय आहे?. तेव्हा तर जगावर आलेलं एक विचित्र संकट होतं कुणाला काही कळत नव्हतं. पण त्याचा मुकाबला मविआ सरकारने केला. महाराष्ट्रात आरोग्य सुविधा वाढवणं, चांगल्या आरोग्य सुविधा देणं याकडे लक्ष दिलं.
अधिक वाचा : काय तर म्हणे चार भिंतीच्या आत शब्द घेतला होता: राज ठाकरे
येत्या महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आता बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलो आहोत. जरा बरं वाटलं एकत्र भेटून, आम्ही कुठेही फुटलेलो नाहीत. एकत्र आहोत. त्यामुळे पुढे काय करायचं हे जेव्हा करणार ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते याचं कारण कायद्यासमोर सर्व सारखे असतात. पण त्याच वेळेला जनता उघड्या डोळ्याने सर्व पाहत असते. न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे आधारस्तंभ मजबूत आहेत तोपर्यंत आपल्या देशात लोकशाहीच राहील असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.