'काय तो दांडा आणि काय ते ढुंXX' म्हणत शिंदे गटावर निशाणा साधणाऱ्या सेनेच्या प्रवक्त्या एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 12, 2022 | 20:16 IST

Big breaking: शिवसेनेच्या प्रवक्त्या आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. 

Shiv Sena flag
File Photo  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यावर त्यांच्यावर शीतल म्हात्रेंनी केली होती टीका
  • शीतल म्हात्रे यांनी केलेल्या टीकेचा व्हिडिओ सुद्धा झाला होता तुफान व्हायरल 

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीचा मोठा फटका शिवसेनेला (Shiv Sena) बसला आहे. राज्यातील मविआ सरकार कोसळलं त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. सत्तांतर होताच ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथमधील नगरसेवकांनी थेट एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेतून मोठे समर्थन मिळताना दिसून येत आहे. त्याच दरम्यान आता मुंबई (Mumbai)तून एक मोठी बातमी समोर येत आहे.

मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) या थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. दहीसर येथून माजी नगरसेविका राहिलेल्या शीतल म्हात्रे या एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. मात्र, त्या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, शितल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला तर तो शिवसेनेसाठी एक मोठा झटका असणार आहे.

हे पण वाचा : नदीत स्कॉर्पिओ गेली वाहून, नागपुरातील धक्कादायक VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल म्हात्रे यांच्या सोबतच पश्चिम उपनगरातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा शीतल म्हात्रे यांच्यासोबत एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत.

शिंदे गटावर केली होती टीका

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यावर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या इतरही आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवत बंड पुकारले. त्यानंतर हे सर्व आमदार गुजरात आणि त्यानंतर गुवाहाटी येथे पोहोचले. गुवाहाटी येथे असताना बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये शहाजीबापू पाटील आपल्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना काय तो डोंगर, काय ती झाडी आणि काय ते हाटील सर्व ओके असं म्हटलं होतं. शहाजीबापू पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमधील हा डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला होता. याच डॉयलॉगवरुन शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता.

शीतल म्हात्रे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना म्हटलं होतं, काय तो डोंगर, काय ती झाडी आणि काय ते हाटील सर्व ओके.... पण आता त्यांना सांगा काय तो दांडा, काय ते ढुंXX सर्व कसं ओके...

ज्याप्रमाणे आमदार शहाजीबापू पाटील यांची ऑडिओ क्लिप आणि त्यातील डायलॉग व्हायरल झाला होता. तशाच प्रकारे शीतल म्हात्रे यांनी त्यावर केलेल्या टीकेची व्हिडिओ क्लिप सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी