BMC imposed strict restrictions on 31st december parties : मुंबईः दरवर्षी नाताळ (ख्रिसमस) आणि वर्षअखेरीस (३१ डिसेंबर) मुंबईत अनेक पार्ट्या होतात. यंदा कोरोना संकटामुळे मुंबईत होणार असलेल्या पार्ट्यांवर महापालिकेने कडक निर्बंध घातले आहेत.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात ओमायक्रॉनचे १५ तर कोरोनाचे ६ हजार ९०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेच्या हद्दीत १ हजार ९४० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामुळे महापालिका प्रशासन खबरदारी घेत आहे. कोरोना संकट वाढू नये म्हणून पात्र नागरिकांनी नियमानुसार लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे; असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मास्क वापरा; असेही आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.