मुंबईच्या सेनापती बापट मार्गाचा कायपालट होणार

मुंबईच्या सेनापती बापट मार्गाचा कायपालट करणार असल्याची घोषणा मुंबई महानगरपालिकेने केली आहे.

bmc plan road widening and beautification of senapati bapat marg mumbai
मुंबईच्या सेनापती बापट मार्गाचा कायपालट होणार 

थोडं पण कामाचं

  • मुंबईच्या सेनापती बापट मार्गाचा कायपालट होणार
  • मध्य मुंबईतील सेनापती बापट मार्ग हा प्रचंड वर्दळीचा रस्ता
  • सेनापती बापट मार्गावरील सर्व अनधिकृत वाहनतळ आणि अनधिकृत बांधकाम हटवणार

मुंबईः मुंबईच्या सेनापती बापट मार्गाचा कायपालट करणार असल्याची घोषणा मुंबई महानगरपालिकेने केली आहे. हा रस्ता दादर, प्रभादेवी, परळ पट्ट्यातून जातो. पादचाऱ्यांसाठी पर्यावरणस्नेही पदपथ (इकोफ्रेंडली फूटपाथ), वाहतूक कोंडीमुक्त प्रशस्त रस्ता, पुलाखालील दुर्लक्षित भागाचे सुशोभीकरण ही कामं केली जातील. पुलाखालच्या भागात मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठांसाठी उद्यान अशी व्यवस्था असेल. रस्त्याचे रुंदीकरण केले जाईल, अशी घोषणा मुंबई महानगरपालिकेने केली आहे. रस्त्याच्या कामासाठी एका बड्या खासगी कंपनीची मदत घेण्याची तयारी केली आहे. (bmc plan road widening and beautification of senapati bapat marg mumbai)

मध्य मुंबईतील सेनापती बापट मार्ग हा प्रचंड वर्दळीचा रस्ता

मध्य मुंबईतील सेनापती बापट मार्ग हा प्रचंड वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नियमितपणे या रस्त्यावरुन प्रवास करणारे नागरिक त्रासले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. तसेच अनेक निवासी इमारती आहेत. यामुळे रस्त्यावर पादचाऱ्यांची कायम ये-जा असते. नागरिकांना मार्गाच्या कडेने काही ठिकाणी गट करुन बसलेल्या गर्दुल्ल्यांचा आणि समाजकंटकांचा प्रचंड त्रास होतो. ही समस्या सोडवण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि पोलिसांची मदत घेण्याची तयारी मुंबई महानगरपालिका करत आहे. 

सेनापती बापट मार्गावरील सर्व अनधिकृत वाहनतळ आणि अनधिकृत बांधकाम हटवणार

सेनापती बापट मार्गावर काही ठिकाणी अनधिकृत वाहनतळ बिनबोभाट सुरू आहेत. हे तळ हटवण्यासाठी योजना तयार केली जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी जी साऊथ वॉर्डमधून जाणाऱ्या सेनापती बापट मार्गाचा कायापालट करणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले. 

पहिल्या टप्प्यात काकासाहेब गाडगीळ मार्गापासून गावडे चौकापर्यंतच्या भागाचा कायापालट करणार

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात काकासाहेब गाडगीळ मार्गापासून गावडे चौकापर्यंतच्या सेनापती बापट मार्गावरील ८०० मीटरच्या भागाचा कायापालट केला जाणार आहे. पादचाऱ्यांसाठी पर्यावरणस्नेही पदपथ (इकोफ्रेंडली फूटपाथ), वाहतूक कोंडीमुक्त प्रशस्त रस्ता, पुलाखालील दुर्लक्षित भागाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. पुलाखालच्या भागात मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठांसाठी उद्यान अशी व्यवस्था असेल. रस्त्याचे रुंदीकरण केले जाईल. अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृतरित्या केलेली रस्त्याची अडवणूक हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला जाईल.

रस्ता रुंदीकरण आणि मार्गिका आखण्याचे काम होणार

सेनापती बापट मार्गावर निवडक ठिकाणी आसन व्यवस्था असेल. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार आहे. तसेच सेनापती बापट मार्गावर पुलाखालील १,७१३ चौरस मीटर जागेवर खेळण्यासाठी मैदान आणि उद्यान तयार केले जाणार आहे. रस्ता रुंदीकरण केले जाईल. तसेच रस्त्यावर मार्गिका करुन वाहतूक कोंडी सोडवली जाईल. संपूर्ण रस्त्यावर स्वतंत्र सायकल ट्रॅक अर्थात साकल मार्गिकाही तयार केली जाणार आहे. सेनापती बापट मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड करुन त्यांची योग्य प्रकारे निगा राखण्यावर भर देणार असल्याचे मुंबई मनपाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी