School Reopening Guidelines : मुंबईत शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जाहीर

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 22, 2022 | 21:55 IST

BMC releases Mumbai school reopening guidelines : मुंबई महापालिकेने सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून शाळांना ऑफलाइन शिक्षण सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना मुंबई महापालिकेने सर्व शाळांसाठी काही मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत.

BMC releases Mumbai school reopening guidelines
मुंबईत शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जाहीर 
थोडं पण कामाचं
 • मुंबईत शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जाहीर
 • मार्गदर्शक तत्वांचे पालन करत शाळांना कारभार सुरू करण्याची परवानगी
 • सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून शाळांना ऑफलाइन शिक्षण सुरू करण्याची परवानगी

BMC releases Mumbai school reopening guidelines : मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्या भागांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे तिथे पूर्व प्राथमिक वर्गांपासून ते बारावी पर्यंतच्या वर्गांना सोमवार पासून ऑफलाइन शिक्षण पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयानुसार मुंबई महापालिकेने सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून शाळांना ऑफलाइन शिक्षण सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना मुंबई महापालिकेने सर्व शाळांसाठी काही मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. या तत्वांचे पालन करत शाळांना कारभार सुरू करण्याची परवानगी आहे.

 1. जे पालक आपल्या पाल्यांना (मुलांना) शाळेत पाठवण्याऐवजी आणखी काही दिवस ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देऊ इच्छितात त्यांना तसे करता येईल.
 2. शाळेत येणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांचे शाळेत येण्यासाठी संमती देणारे पत्र सोबत आणावे लागेल.
 3. शिक्षकांना वर्गात ऑफलाइन शिकवताना व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने आवश्यकता भासल्यास ऑनलाइन पण शिकवावे लागेल.
 4. शाळेत येणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरण करुन शाळेत येण्याचे बंधन.
 5. शाळेत येणाऱ्या १५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसचा डोस घेऊन शाळेत येण्याचे आवाहन.
 6. शाळेत विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना सोशल डिस्टंस राखण्याचे तसेच मास्क घालण्याचे बंधन.
 7. शाळा व्यवस्थापनाने शाळा परिसरात स्वच्छता राखावी तसेच शाळेच्या आवारात ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था ठेवावी.
 8. आजारी असलेल्या तसेच सर्दी-खोकला-ताप-डोकेदुखी-अंगदुखी यापैकी कोणतेही लक्षण आढळलेल्या व्यक्तीला शाळेत प्रवेश नसेल.
 9. शाळेत खेळाचा तास नसेल तसेच प्रार्थनेच्या अथवा डबा खाण्याच्या निमित्ताने अथवा अन्य कोणत्याही कारणाने विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंसचे उल्लंघन करुन एकत्र येण्यास सक्त मनाई असेल.
 10. शाळेत कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे बंधन.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी