Dahi Handi 2022: दहीहंडी सणाच्या (Dahi Handi 2022) आदल्या दिवशी रायगडमधील समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट (Suspicious Boat In Raigad ) आढळली असून या बोटीमध्ये तीन एके- 47 रायफल आढळून आल्या त्यामुळे एकच खळबळ उडाली. ही संशयास्पद बोट हरिहरेश्वर किनाऱ्यावर आढळल्यानंतर राज्यामध्ये हायअलर्ट (High Alert ) देण्यात आला आहे. राज्यातील सर्व प्रमुख ठिकाणी, महत्वाची शहरे आणि सागरी महामार्गावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ठिक-ठिकाणी नाकाबंदी केली जात आहे.
तब्बल दोन वर्षांनंतर देशभरात दहीहंडी साजरी केली जाणार असल्याने सणाचा उत्साह शिगेला पोहचला आहे अशामध्ये या संशयास्पद बोटी आढळल्यामुळे पोलिसांना (Mumbai Police) सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत दहहंडीचा मोठा उत्साह असतो. या सणाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईमध्ये सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
Read Also : Horoscope Today : पाहा तुमच्यासाठी आजचा दिवस कसा जाईल
Read Also : उद्यापासून मुंबईत धावणार आणखी १० लोकल एसी गाड्या
रायगडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सतर्कतेच्या सूचना दिल्या. याच पार्श्वभूमीवर शहरात प्रमुख चौकात नाकाबंदीही लावण्यात आली आहे.
हरिहरेश्वमध्ये संशयास्पद बोट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले आहेत. सागरी महामार्गावरील गस्तही वाढवण्यात आली आहे. 20 हून अधिक सागरी महामार्गावरील चेक पोस्ट अलर्टवर आहेत. सागरी किनाऱ्यावरील लँडिंग पॉईंट वर 24 तास पोलिसांची नजर असणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.