हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आढळली AK-47, काडतुसं असलेल्या बोट; महाराष्ट्र ATS प्रमुखांकडून बोटीची पाहणी

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 19, 2022 | 08:41 IST

रायगड जिल्ह्यातील (Raigad district) हरिहरेश्वरच्या (Harihareshwar beach) समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-47 आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. सध्यातरी या बोटीचा दहशतवाद्यांशी (terrorists) काही संबंध दिसत नसला तरी राज्य सरकार (State Govt) हाय अलर्टवर आहे. या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहेत.

Maharashtra ATS investigates boat carrying AK-47, cartridges
AK-47, काडतुसं असलेल्या बोटीचा तपास महाराष्ट्र ATS कडे  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची पाहणी केली आहे.
  • या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. आम्हाला बोटीतून काही कागदपत्रं मिळाली आहेत. -एटीएस प्रमुख
  • रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेल्या बोटीत एके- 47 सापडल्या असल्या तरी सध्यातरी याचा दहशतवाद्यांशी संबंध आढळून आलेला नाही.

मुंबई : रायगड जिल्ह्यातील (Raigad district) हरिहरेश्वरच्या (Harihareshwar beach) समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-47 आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. सध्यातरी या बोटीचा दहशतवाद्यांशी (terrorists) काही संबंध दिसत नसला तरी राज्य सरकार (State Govt) हाय अलर्टवर आहे. या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहेत. आता याप्रकरणाची तपासणी आता महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) करत असून एटीएस प्रमुख (ATS Chief) विनित अग्रवाल (Vinit Aggarwal) यांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची पाहणी केली आहे.

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी या बोटीची पाहणी केली आहे. तसेच त्यांनी याबाबत स्थानिक पोलीस आणि नागरिकांशीही चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान, या संदर्भात एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. आम्हाला बोटीतून काही कागदपत्रं मिळाली आहेत. समुद्रातून आम्ही ही बोट बाहेर काढत आहोत, असे एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी सांगितले. 

Read Also : Horoscope Today : पाहा तुमच्यासाठी आजचा दिवस कसा जाईल

काय आहे प्रकरण?

आज सकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-47 आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हायअलर्ट जारी केला आहे. 

एके-47 वाली बोट आहे कोणाची  

रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेल्या बोटीत एके- 47 सापडल्या असल्या तरी सध्यातरी याचा दहशतवाद्यांशी संबंध आढळून आलेला नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव लेडीहान असून ती एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची आहे. हाना लॉडर्सगन असं या ऑस्ट्रेलियन नागरिकाचे नाव असून ती एक महिला आहे. तीचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान आहेत.

Read Also : अमेरिका किंवा युरोपमध्ये जायचंय, मग व्हिसासाठी थांबा 500दिवस

ही बोट मस्कटहून युरोपकडे जाणार होती. मात्र, बोटीचे इंजिन बिघडल्याने बोटीवरील सर्वांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. त्यामुळे समुद्राच्या प्रवाहाने ती बोट रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आली, अशी माहिती देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी