Mumbai Bank मधील बोगस मजूर प्रकरण : पोलीस ठाण्यात हजर होण्याची प्रवीण दरेकरांना मुंबई पोलिसांची नोटीस

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 03, 2022 | 08:33 IST

मुंबै बँक (Mumbai Bank) मजूर प्रकरणात (Labor Case) विधानपरिषदेचे (Legislative Council Opposition Leader) विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोटीस बजावली आहे.

Praveen Darekar
प्रविण दरेकरांना मुंबई पोलिसांची नोटीस   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती.
  • दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत.
  • आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली

मुंबई : मुंबै बँक (Mumbai Bank) मजूर प्रकरणात (Labor Case) विधानपरिषदेचे (Legislative Council Opposition Leader) विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोटीस बजावली आहे. प्रवीण दरेकर यांना 4 एप्रिल सोमवारी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर (Mata Ramabai Ambedkar) पोलीस ठाण्यात (Police station) हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजर राहावे लागणार आहे. 

मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. दरेकरांवर फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. 

Read Also : नवाब मलिकांना जेलमध्ये मिळणार 'या' सुविधा!

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

Read Also :  तेरा दिवसात 11 वेळा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

प्रवीण दरेकर यांना दोन आठवड्यांचा दिलासा 

मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचा दिलासा दिला आहे. दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावर 29 मार्च रोजी उच्च न्यायालयात वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचे वकील अखिलेश चौबे यांनी पुढील सुनावणीपर्यंत दिलेला दिलासा कायम ठेवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायमूर्ती अनूजा प्रभूदेसाई यांनी ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी