काजोल कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 30, 2022 | 15:36 IST

Bollywood Actress Kajol Corona Positive : बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिला कोरोना झाला आहे. सध्या ती क्वारंटाइन राहून उपचार घेत आहे. काजोलने कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. ही माहिती देताना काजोलने मुलगी न्यासा देवगण हिचा फोटो शेअर केला आहे. 

Bollywood Actress Kajol Corona Positive
काजोल कोरोना पॉझिटिव्ह 
थोडं पण कामाचं
  • काजोल कोरोना पॉझिटिव्ह
  • क्वारंटाइन होऊन घेत आहे उपचार
  • इन्स्टावर पोस्ट करून दिली माहिती

Bollywood Actress Kajol Corona Positive : मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिला कोरोना झाला आहे. सध्या ती क्वारंटाइन राहून उपचार घेत आहे. काजोलने कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. ही माहिती देताना काजोलने मुलगी न्यासा देवगण हिचा फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Kajol Devgan (@kajol)

कोरोनाबाधीत झालेला माझा आजारी चेहरा आणि सर्दीने लाल झालेले नाक बघण्यापेक्षा हा हसरा चेहरा बघा, असे सांगत काजोलने न्यासाचा फोटो शेअर केला आहे. फोटोत न्यासाच्या हातावर मेंदी दिसत आहे आणि ती हातातली आकर्षक अंगठी दाखवत आहे. न्यासा एखाद्या समारंभाला उपस्थित असताना काढलेला हा फोटो आहे. 

सध्या न्यासा देवगण उच्च शिक्षणासाठी सिंगापूरमध्ये आहे. मुलीला भेटण्याच्या निमित्ताने काजोल अनेकदा मुंबई-सिंगापूर-मुंबई असा प्रवास करत असते. क्वारंटाइन झाल्यामुळे न्यासाला मिस करत आहे असे इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काजोलने नमूद केले आहे. 

काजोल कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळताच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी लवकर बरी हो अशा स्वरुपाच्या सदिच्छा व्यक्त केल्या. बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर व्यक्त होऊन न्यासा फोटोत सुंदर दिसत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तसेच काजोल लवकर बरी व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

मागील दीड-दोन वर्षांत अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या, करिना कपूर खान, जॉन अब्राहम, मृणाल ठाकुर, एकता कपूर, नकुल मेहता, नोरा फतेही, अमृता अरोरा, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची बाधा झाली आहे.

काजोलने २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'त्रिभंगा' या कौटुंबिक वेबसीरिजमध्ये काम केले होते. लवकरच काजोलने भूमिका साकारलेला 'द लास्ट हुर्रे' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी