High Court वानखेडेंची बदनामी केल्याप्रकरणी मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 08, 2021 | 20:52 IST

Bombay High Court Directs Nawab Malik To File Reply To Wankhede's Defamation Suit By Tomorrow समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावर नवाब मलिक यांनी आरोपांची राळ उडवली. या प्रकरणात मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, असा आदेश मुंबईच्या उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना दिला.

Bombay High Court Directs Nawab Malik To File Reply To Wankhede's Defamation Suit By Tomorrow
वानखेडेंची बदनामी केल्याप्रकरणी मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश 
थोडं पण कामाचं
  • वानखेडेंची बदनामी केल्याप्रकरणी मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
  • मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश
  • सुनावणी बुधवार १० नोव्हेंबर २०२१ रोजी होणार

Bombay High Court Directs Nawab Malik To File Reply To Wankhede's Defamation Suit By Tomorrow मुंबईः एनसीबीच्या मुंबई कार्यालयात कार्यरत असलेले झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावर नवाब मलिक यांनी आरोपांची राळ उडवली. या प्रकरणात मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, असा आदेश मुंबईच्या उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना दिला. पुढील सुनावणी बुधवार १० नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.

महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांनी आरोपांची राळ उडवल्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली. ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा (मानहानी) दावा करुन मलिकांकडून भरपाई म्हणून सव्वा कोटी रुपयांची मागणी केली आहे. या प्रकरणात आज (सोमवार ८ नोव्हेंबर २०२१) झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला.

वानखेडे यांच्या वतीने वकील अर्शद शेख यांनी युक्तीवाद केला, तर मलिक यांच्या वतीने वकील अतुल दामले यांनी युक्तीवाद केला. मलिक यांच्या विरोधात भाजपचे नेते मोहित भारती यांनीही १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला.

दावा करताना काय म्हणाले ज्ञानदेव वानखेडे - 

  1. नवाब मलिक यांच्या आरोपामुळे कुटुंबाचे आणि वैयक्तीक भरून न येणारे नुकसान झाले
  2. नवाब मलिक यांना सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे यांवर आमची बदनामी होईल असे वक्तव्य करण्यास कायमस्वरूपी बंदी आणावी
  3. आमची बदनामी केलेली आतापर्यंतची वक्तव्ये, प्रसिद्धी पत्रके, ट्विट, सोशल मीडिया पोस्ट डीलीट (Delet) करण्याचे आदेश द्यावेत
  4. पत्रकार परिषद आणि सोशल मीडियामधून वक्तव्य करून नवाब मलिक यांनी आमच्या कुटुंबाची मानहानी केली, त्यामुळे मलिक यांनी सव्वा कोटी रुपयांची भरपाई द्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी