Anil Parab : मुंबई हायकोर्टाचा अनिल परब यांना साई रिसॉर्ट प्रकरणी दिलासा; 20 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 14, 2023 | 17:30 IST

ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांना मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) दिलासा दिला आहे. परब यांना 20 मार्चपर्यंत अटकेपासून अंतरीम संरक्षण दिले आहे. या तारखेपर्यंत ईडीला परब यांच्याविरुद्धात कोणतीही कठोर कारवाई करता येणार नाही.

Bombay High Court gives relief to Anil Parab in Sai Resort case
मुंबई हायकोर्टाचा अनिल परब यांना साई रिसॉर्ट प्रकरणी दिलासा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे.
  • साई रिसॉर्ट व्यवहारात मनी लाँड्रिंग झाला असल्याचा ईडीचा आरोप आहे.
  • अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अनिल परब यांनी दाखल केली.

मुंबई :   ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांना मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) दिलासा दिला आहे. परब यांना 20 मार्चपर्यंत अटकेपासून अंतरीम संरक्षण दिले आहे. या तारखेपर्यंत ईडीला परब यांच्याविरुद्धात कोणतीही कठोर कारवाई करता येणार नाही. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Case)ईडीने परब यांचे व्यावसायिक भागीदार असलेले सदानंद कदम यांना अटक केली.  (Bombay High Court gives relief to Anil Parab in Sai Resort case; Protection from arrest till March 20)

अधिक वाचा  : कालाष्टमी म्हणजे काय? काय आहे कालाष्टमीचे नियम?

त्यानंतर आज अनिल परब यांच्याकडून आज हायकोर्टात धाव घेतली. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अनिल परब यांनी दाखल केली.या याचिकेवर आज सुनावणी झाली असता न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. साई रिसॉर्ट व्यवहारात मनी लाँड्रिंग झाला असल्याचा ईडीचा आरोप आहे. त्या प्रकरणी सदानंद कदम यांना अटक झाली आहे.

अधिक वाचा  : Arshi Khan ने हॉट अन् बोल्ड दिसण्यासाठी केली Hips surgery

ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. तर सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटले आहे. सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर अनिल परब यांना अटक करण्यात येणार असल्याचे सूचक वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले होते. त्यानंतर ईडीच्या संभाव्य कठोर कारवाईपासून संरक्षण मिळवण्यासाठी आज अनिल परब यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.  

अधिक वाचा  : पोरं अभ्यास करत नसतील तर पालकांनो करा या गोष्टी

परब यांच्यावतीने अॅड. अमित देसाई यांनी बाजू मांडली. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा सगळीकडे दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी युक्तिवादात म्हटले. सोमय्या यांना कोणतीही कारवाई होण्यापूर्वीच त्याची माहिती मिळते. मग ते सोशल मीडियावरून धमक्या देतात, असा युक्तिवाद परब यांच्यावतीने करण्यात आला. 

अधिक वाचा  : असे मित्र शत्रूपेक्षा असतात जास्त धोकादायक, वेळेतच व्हा दूर
 
 इतक्या जुन्या प्रकरणांत आता अचानक ही कारवाई का करण्यात आली? असा हायकोर्टाने सवाल केला. ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टात युक्तिवाद केला. या प्रकरणी जो पहिला गुन्हा दाखल करण्यात आला त्याला कोर्टाने स्थगिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र जो दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला, तो पहिल्यापासून वेगळा आहे असा युक्तिवाद त्यांनी केला. कोर्टाने ईडीच्या ईसीआयआरला कोणतीही स्थगिती दिलेली नाही, याकडेही त्यांनी हायकोर्टाचे लक्ष वेधले. त्यामुळे ईडीने याप्रकरणी आपली कायदेशीर कारवाई सुरूच ठेवली असल्याची माहिती एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टाला दिली.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी