पीएमसी बँक घोटाळा: राकेश वाधवानचा जामीन फेटाळला

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 15, 2021 | 01:10 IST

पुणे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा (पीएमसी बँक घोटाळा) प्रकरणातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान याचा जामीन अर्ज मुंबईच्या उच्च न्यायालयाने फेटाळला.

Bombay High Court rejects bail plea of Rakesh Wadhawan in PMC Bank fraud case
पीएमसी बँक घोटाळा: राकेश वाधवानचा जामीन फेटाळला 
थोडं पण कामाचं
  • पीएमसी बँक घोटाळा: राकेश वाधवानचा जामीन फेटाळला
  • जामीन अर्ज मुंबईच्या उच्च न्यायालयाने फेटाळला
  • एचडीआयएलचे संस्थापक आणि पीएमसी बँकेचे सर्वाधिक कर्ज थकविणारे थकबाकीदार राकेश वाधवान

मुंबईः पुणे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा (पीएमसी बँक घोटाळा) प्रकरणातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान याचा जामीन अर्ज मुंबईच्या उच्च न्यायालयाने फेटाळला. एचडीआयएलचे (Housing Development Infrastructure Limited - HDIL) संस्थापक आणि पीएमसी बँकेचे सर्वाधिक कर्ज थकविणारे थकबाकीदार राकेश वाधवान यांनी तब्येतीचे आणि वयाचे कारण देत जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. Bombay High Court rejects bail plea of Rakesh Wadhawan in PMC Bank fraud case 

ईडी आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुणे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा (पीएमसी बँक घोटाळा) प्रकरणात राकेश वाधवान याच्यावर गंभीर आरोप ठेवत तक्रारी नोंदवल्या आहेत. या तक्रारींचे गांभिर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला. सध्या राकेश वाधवान मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. 

हृदयाचे कार्य सुरळीत सुरू राहावे यासाठी एक नवा पेसमेकर बसवून घ्यायचा आहे. यासाठीची शस्त्रक्रिया खासगी हॉस्पिटलमध्ये करुन घेण्याची परवानगी मिळावी असे सांगत राकेश वाधवानने जामिनासाठी अर्ज केला होता. पण आवश्यक असलेले उपचार आणि शस्त्रक्रिया मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये शक्य आहे. अडचणी जाणवल्यास आरोपी रुग्णाला मुंबईच्याच जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करणे शक्य आहे. हीच बाब निदर्शनास आणून देऊन सरकारी वकिलाने जामीन देण्यास विरोध केला. मुंबईच्या उच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकल्यानंतर राकेश वाधवान याचा तब्येत आणि वयाचे कारण देत केलेला जामीन अर्ज फेटाळला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी