Bombay High Court relieves Aryan Khan आर्यन खानला मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिला दिलासा, पण...

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 15, 2021 | 16:50 IST

Bombay High Court relieves Aryan Khan from appearing before Mumbai NCB every week but directs him to appear before Delhi SIT whenever summoned अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुझ ड्रग प्रकरणात मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिलासा दिला. पण ज्या वेळी दिल्ली एसआयटी बोलवेल त्या वेळी आर्यन खानला त्यांच्यासमोर हजर होऊन चौकशीत पूर्ण सहकार्य करावे लागेल.

Bombay High Court relieves Aryan Khan
आर्यन खानला मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिला दिलासा, पण... 
थोडं पण कामाचं
  • आर्यन खानला मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिला दिलासा, पण...
  • ज्या वेळी दिल्ली एसआयटी बोलवेल त्या वेळी आर्यन खानला त्यांच्यासमोर हजर होऊन चौकशीत पूर्ण सहकार्य करावे लागेल
  • आर्यन खानच्या याचिकेवर मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिला निर्णय

Bombay High Court relieves Aryan Khan from appearing before Mumbai NCB every week but directs him to appear before Delhi SIT whenever summoned मुंबईः अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुझ ड्रग प्रकरणात मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिलासा दिला. आर्यन खान याला २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सशर्त जामीन देण्यात आला. जामीन देताना घातलेल्या अटीनुसार आर्यन खानला दर शुक्रवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी देण्याचे बंधन घालण्यात आले होते. मुंबईच्या उच्च न्यायालयाने आर्यन खानची या बंधनातून मुक्तता केली. 

मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, आर्यन खानला आता दर शुक्रवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी देण्याचे बंधन नसेल. पण मुंबई बाहेर जाण्याआधी त्याला एनसीबीच्या मुंबई कार्यालयाला आपल्या पूर्ण कार्यक्रमाची माहिती द्यावी लागेल. 

सध्या दिल्ली एसआयटी क्रुझ ड्रग प्रकरणाचा तपास करत आहे. यामुळे ज्या वेळी दिल्ली एसआयटी बोलवेल त्या वेळी आर्यन खानला त्यांच्यासमोर हजर होऊन चौकशीत पूर्ण सहकार्य करावे लागेल; असाही आदेश मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिला आहे. 

एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्यासाठी जातो त्या दर शुक्रवारी तिथे मीडिया प्रतिनिधी आणि नागरिकांची प्रचंड गर्दी होते. प्रत्येक वेळी पोलिसांच्या सहकार्याने एनसीबी कार्यालयात प्रवेश करावा लागतो आणि पोलिसांच्याच सहकार्याने एनसीबी कार्यालयातून बाहेर पडून कारमध्ये प्रवेश करावा लागतो. यानंतर कार मुख्य रस्त्यावरुन वेगाने प्रवास सुरू करेपर्यंत गराड्याचा त्रास सहन करावा लागतो. या त्रासाचे कारण देत आर्यन खानने मुंबईच्या उच्च न्यायालयाकडे दिलासा देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने सर्व मुद्दे ऐकून आणि समजून घेऊन आर्यन खानला दिलासा दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी