Maharashtra: ब्रेकअप होताच बॉयफ्रेंडची सटकली अन् रागाच्या भरात गर्लफ्रेंड....

Crime News: गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यावर एका बॉयफ्रेंडने एक धक्कादायक कृत्य केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याने बॉयफ्रेंड संतापला
  • बॉयफ्रेंडने रागाच्या भरात केलं धक्कादायक कृत्य
  • या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला केली अटक

Crime News Maharashtra: प्रेमाचं नातं खूपच सुंदर असतं. मात्र, याच प्रेमात कधी-कधी काहीजण इतके वेडे होतात की काहीतरी भलतंच करुन बसतात. अनेकदा प्रेमात काहीजण असे निर्णय घेतात की त्याचे खूपच भयंकर परिणाम होऊ शकतात. असाच एक प्रकार महाराष्ट्रात घडला आहे. एका बॉयफ्रेंडने ब्रेकअप झाल्यावर रागाच्या भरात आपल्या एक्स गर्लफ्रेंडचं घर बॉम्बने उडवून देण्याचीच धमकी दिली. (boyfriend threatening girlfriend after break up mumbai ahmednagar crime news marathi)

या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली की, पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये एक फोन आला आणि सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील जावेरी बाजार आणि नानाज येथे बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. याच ठिकाणी त्या व्यक्तीची एक्स गर्लफ्रेंड राहत होती. हा फोन येताच पोलीस कामाला लागले आणि तपास सुरू केला. मात्र, तपासाअंती भलताच प्रकार समोर आला.

हे पण वाचा : प्रभासला अ‍ॅक्टिंग नाही तर करायचं होतं 'हे' काम​

पोलिसांच्या तपासात समोर आले की, आरोपी दिनेश सुतार याचं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं होतं. यामुळे तो खूपच नाराज होता. इतकेच नाही तर त्याला नशा करण्याचीही सवय लागली होती. नशेत असतानाच त्याने पोलीस कंट्रोल रूमला फोन करत बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल केला. आरोपी हा सांगलीचा निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 

आरोपी हा झवेरी बाजारात आर्टिफिशियल ज्वेलरी वर्कशॉपमध्ये काम करतो. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी 112 क्रमांक आरोपीने डायल केला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले की, नानज आणि जावेरी बाजारातील खाऊ गल्लीत बॉम्ब लावण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला.

हे पण वाचा : सोन्यापेक्षाही महाग आहेत हे धातू, किंमत ऐकून चक्रावून जाल

स्थानिक पोलीस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, दहशतवादविरोधी पथक, गुन्हे शाखेचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपास केल्यावर हा एक फेक कॉल असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी फोन कुठून आला होता याचा तपास केला आणि दोन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी