Sanjay Raut यांच्या हक्कभंगावर मोठा ट्विस्ट, शिंदे-फडणवीस सरकारचा डाव पालटला..!

maharashtra budget session : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्याने विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्याविरोधात 'हक्कभंग' आणावा, अशी मागणी केली.

Sanjay Raut यांच्या हक्कभंगावर मोठा ट्विस्ट, शिंदे-फडणवीस सरकारचा डाव पालटला..!
breach of privilege motion in the maharashtra legislature against mp sanjay raut  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अडचणीत
  • 'विधिमंडळ नसून चोरमंडळ' असं वक्तव्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या चोर मंडळ या वादग्रस्त विधानावर बुधवारी विधानसभेत गदारोळ झाला. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी राऊत यांच्याविरोधात विशेषाधिकार भंग प्रस्तावाची मागणी करत घोषणाबाजी केली. त्यामुळे तीन वेळा तहकूब केल्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी एक वाजता दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांत चौकशी करून याबाबतचा अहवाल 8 मार्च रोजी सादर करणार असल्याचे सांगितले. (breach of privilege motion in the maharashtra legislature against mp sanjay raut)

अधिक वाचा : SSC Exam 2023: 2 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू, सर्व विद्यार्थ्यांना ALL THE BEST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला ‘चोर मंडळ’ म्हणणे खपवून घेतले जाणार नाही आणि हा विधिमंडळाचा अपमान असल्याचे सांगितले. हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा सदस्याचा मुद्दा नसून सभागृहाच्या प्रतिष्ठेवर आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर हल्ला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

अधिक वाचा : Today Horoscope 2 March : या 5 राशींसाठी गुरुवारचा दिवस असेल वाईट, मोठ्या दुर्घटनेची शक्यता

त्याचवेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस देऊन हा घटनेला कलंक असल्याचे म्हटले आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, येत्या काही दिवसांत राऊत यांच्या विधानांची सखोल तपासणी करून 8 मार्च रोजी या प्रकरणी निर्णय घेऊ. त्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब केले.

अधिक वाचा : ऑलेक्ट्राचा इलेक्ट्रिक  टिप्पर रस्त्यावर धावायला सज्ज 

खासदार संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, विधिमंडळात बनावट शिवसेना आहे, चोर मंडळ म्हणजेच चोरांची टोळी आहे. असे वादग्रस्त व्यक्त केले होते. 

या वक्तव्यावरून विधीमंडळात भाजप आणि शिवसेनेचे आमदार आक्रमक झाल्यानंतर विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग समितीत १४ सदस्यांची नेमणूक केली आहे. यामध्ये 6 सदस्य भाजपचे तर 3 सदस्य शिवसेनेचे असणार आहेत. तर 5 सदस्य विरोधी पक्षातील असणार आहेत. या समितीचे अध्यक्ष पद राहुल कुल यांच्याकडे देण्यात आले आहे. 

अधिक वाचा : Increase Risk Of Heart attack: तुम्ही पण दात न घासता चहा पितात का? हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असू शकतो… 

ठाकरे गटाचे नेते राऊतांवर हक्कभंग दाखल करुन त्यांना शिक्षेस पात्र करण्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचा उद्देश होता. मात्र, राज्यसभा सदस्यावर असा हक्कभंग विधीमंडळात दाखलच करता येत नाही, महाराष्ट्र विधिमंडळ सभागृहाला त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. महाराष्ट्र विधिमंडळ याप्रकरणाबाबत फक्त चौकशी करु शकते. अशी माहिती विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी