Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 15, 2021 | 09:29 IST

Bullock Cart Race Hearing in SC : राज्यात बैलगाडा आणि बैलांच्या शर्यतीला (bullock cart race) बंदी  असून ही  बैलगाडा शर्यत पुन्हा  सुरू करण्याची मागणी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून वारंवार होत आहे.

Bullock Cart Race
Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटणार?   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत मागणी.
  • बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.
  • 2017 साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली

Bullock Cart Race Hearing in SC : नवी दिल्ली:  राज्यात बैलगाडा आणि बैलांच्या शर्यतीला (bullock cart race) बंदी  असून ही  बैलगाडा शर्यत पुन्हा  सुरू करण्याची मागणी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून वारंवार होत आहे. 2017 साली मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्यानंतर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने (State Government) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)सुनावणी होणार आहे. 

मागच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. ही बंदी आतापर्यंत कायम आहे. आता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

बैलगाडा शर्यतीवर बंदी का ?  

घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणं, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असं सांगत प्राणीमित्रांनी शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी केली होती. अजूनही प्राणीमित्र आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारची याचिका निकाली काढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
दरम्यान, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत मागणी झाली.

ग्रामीण भागात अनेकदा आंदोलने झाली आहेत. राज्यातील ग्रामीण भागात बैलगाड्या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. त्यामुळे गावच्या जत्रांमध्ये तमाशा आणि कुस्तीच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाड्या शर्यती बंद झाल्या. बैलांवरील अमानुष अत्याचार थांबावेत म्हणून अशा शर्यतींवर बंदी घालण्याचीस मागणी प्राणी मित्र करत आहेत.

राज्यातील बैलगाडा शर्यतीस प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतक-यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यात या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून बैलगाड्या शर्यत सुरु होणार, असल्याचा विश्वास पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी