Diwali Burning Cases : फटाक्यांपेक्षा दिवा धोकादायक, मुंबईत गेल्या 5 वर्षांत दिवाळीत सर्वाधिक भाजल्याच्या घटना

Diwali Burning Cases : मुंबई आणि ठाण्यात यंदा मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी झाली. परंतु त्यात ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण वाढलेच तसेच भाजल्याच्या घटनेतही वाढ झाली आहे. ऐरोली येथी नॅशनल बर्न्स सेंटर येथे अवघ्या तीन दिवसांत भाजल्याच्या 25 केसेस दाखल झाल्या आहेत. या प्रकरणांमध्ये रुग्ण 10 ते 40 टक्के भाजले आहेत.

diwali burning cases
दिवाळीत भाजल्याच्या घटना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबई आणि ठाण्यात यंदा मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी झाली.
  • परंतु त्यात ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण वाढलेच तसेच भाजल्याच्या घटनेतही वाढ झाली आहे.
  • ऐरोली येथी नॅशनल बर्न्स सेंटर येथे अवघ्या तीन दिवसांत भाजल्याच्या 25 केसेस दाखल झाल्या आहेत.

Diwali Burning Cases : मुंबई  : मुंबई आणि ठाण्यात यंदा मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी झाली. परंतु त्यात ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण वाढलेच तसेच भाजल्याच्या घटनेतही वाढ झाली आहे. ऐरोली येथी नॅशनल बर्न्स सेंटर येथे अवघ्या तीन दिवसांत भाजल्याच्या 25 केसेस दाखल झाल्या आहेत. या प्रकरणांमध्ये रुग्ण 10 ते 40 टक्के भाजले आहेत. गेल्या पाच वर्षांत दिवाळीत एका महिन्याल्या 25 केसेस यायच्या. आता अवघ्या तीन दिवसांत 25 केसेस आल्या आहेत. आगामी काळात भाजल्याच्या आणखी केसेसे येऊ शकतात अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. (burning cases increased in mumbai in diwali 10 to 40 percent burning injuries)

अधिक वाचा : Aurangabad Crime News : जादुटोणा केल्याच्या संशयावरून तरुणाने स्वयंघोषित वैद्याची केली हत्या

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार एकूण 25 केसेस पैकी 12 जण हे लहान मुले आहेत. बहुतांश मुले ही फटाके फोडल्यामुळे भाजले आहेत. फक्त फटाकेच नाही तर दिवाळीला लावले जाणारे दिवेही तितकेच धोकादायक असल्याचे डॉक्टर सुनील केसवानी यांनी सांगितले आहेत. डॉ. केसवानी नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये वरिष्ठ डॉक्टर आहेत. 21 दिवसांच्या अवधीत शक्यतो 25 भाजल्याच्या केसेस आमच्याकडे येतात असे डॉ. केसवानी म्हणाले. परंतु यंदा दिवाळीत अवघ्या तीन दिवसांत 25 केसेस आल्या आहेत. पुढील 10 ते 15 दिवसांत या केसेसमध्ये वाढ होऊन 50 पर्यंत जाण्याची भिती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.  कोरोना काळात सणांवर निर्बंध असल्याने 2019 साली भाजल्याच्या केसेस आल्या नव्हत्या. 

अधिक वाचा :  Domestic Violence : सुनेला घराची कामे सांगणे म्हणजे क्रूरता नाही, औरंगाबाद खंडपीठाचे मत


फटाक्यांमुळे भाजण्यात बहुतांश रुग्णांमध्ये मुले आणि पुरुषांचा समावेश आहे. फटाके फोडताना भाजल्यास हात आणि चेहर्‍याला सर्वाधिक इजा पोहोचते. फटाके फोडताना भाजल्यास शरीराचा 10 टक्के भाग भाजला जातो. परंतु फटाक्यांपेक्षा कधी कधी दिवे जास्त धोकादायक ठरतात. दिव्यांमुळे शरीराचा 40 टक्के भाग भाजला जातो अशी माहिती केसवानी यांनी दिली. मुंबईत एका 8 वर्षीय मुलगी एका दिव्याजवळ खेळत होती, तेव्हा दिव्यामुळे तिचा ड्रेस जळाला आणि यात ती मुलगी 40 टक्के भाजली. अशा वेळी कधीही जमिनीवर दिवा लावू नये. तसेच तेलाच्या दिव्यांमुळे कपड्यांना लगेच आग लागते. अशावेळी मेणाचे दिवे लावावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.  

अधिक वाचा : Election: नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका कधी? समोर आली मोठी अपडेट


फटाक्यांमुळे भाजल्यास घरच्या घरी थोडे प्रथमोपचार करून रुग्णालयात आणल्यास योग्य ठरते. परंतु दिव्यामुळे भाजल्यास तत्काळ रुग्णालयात आणणे गरजेचे असते. दिव्यामुळे भाजल्यास त्याची तीव्रता 70 टक्क्यांपर्यत जाऊ शकते. अशा वेळी रुग्णाला तत्काळ रुग्णालयात उपचार मिळणे गरजेचे असते. यावेळी एक रुग्ण भेदरलेला असतो त्याल जिवाचीही भिती असते म्हणून रुग्णालयात उपचार घेणे गरजेचे असल्याचे केसवानी यांनी सांगितले. 

स्कीन डोनेशनची गरजेचे 

आमच्याकडे दाखल झालेल्या रुग्णाला आम्ही पूर्ण उपचार करतो, इतकेच नाही तर रुग्णालयाकडे असलेल्या स्किन बँकेतून त्यांना योग्य ती त्वचाही लावली जाते असे डॉ. केसवानी म्हणाले.  अशा वेळी स्किन डोनेशन फार महत्त्वाचे ठरते. महिन्याला 20 जण आपली त्वचा दान करतात. परंतु संपूर्ण महाराष्ट्राला दिवसाला 150 जणांनी त्वचा दान करणेचे गरजेचे आहे असे डॉक्टारांनी सांगितले. याबाबत कमी जनजागृती आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन त्वचा दान करावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी