Cabinet Expansion:गुलाबी थंडीत नेत्यांसाठी गरमागरम बातमी; हिवाळी अधिवेशनापूर्वीच सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 23, 2022 | 09:26 IST

एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील, तसेच भाजपमधील आमदारांपैकी अनेक इच्छुक मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. विशेषतः शिंदे यांच्या पक्षातील आमदारांची अस्वस्थता सातत्याने दिसून येते. नेत्यांची ही चिंता आता मिटणार आहे.

 Cabinet expansion of Shinde-Fadnavis government ahead of winter session
Cabinet Expansionअधिवेशनाआधी नेत्यांची नाराजी दूर होणार?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पहिल्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या नेत्यांमध्ये कमालीची नाराजी होती.
  • अधिवेशनाच्या आधीच मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली.
  • शिंदे यांच्या पक्षातील अनेक अस्वस्थ आमदार मंत्रीपद न मिळाल्याने पुन्हा एकदा बंडखोरी करणार का ?

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा( Shinde-Fadnavis government) पहिला  मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) झाल्यानंतरच दुसरा विस्तार कधी होणार याची चर्चा सुरू झाली होती. पहिल्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या नेत्यांमध्ये कमालीची नाराजी होती. दरम्यान शिंदे- फडणवीस सरकार नाराज नेत्यांची नाराजी दूर करणार आहे. पहिल्या मंत्रिमंडळापासूनच दुसरा  मंत्रिमंडळ विस्तारा कधी होईल, याची उत्सुकता लागली होती. ही उत्सुकता सरकार ऐन गुलाबी थंडीतील हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter session) मिटवणार आहेत. (Cabinet Expansion: Cabinet expansion of Shinde-Fadnavis government ahead of winter session)

अधिक वाचा  :कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर संभाजीराजेंचं PM ला पत्र

एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील, तसेच भाजपमधील आमदारांपैकी अनेक इच्छुक मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. विशेषतः शिंदे यांच्या पक्षातील आमदारांची अस्वस्थता सातत्याने दिसून येते. नेत्यांची ही चिंता आता मिटणार आहे. अधिवेशनाच्या आधीच मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली. 'विस्तारानंतर सर्वच चर्चांना विराम मिळेल,' असेही जैस्वाल म्हणाले.

अधिक वाचा  : फिफा वर्ल्ड कपमध्ये उलटफेर, सौदीने अर्जेंटिनाला दिला धक्का

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला स्थान मिळेल, याची चर्चा होत असताना काही आमदार उघडपणे विस्तार होत नसल्याने नाराजीही व्यक्त करताना दिसत आहेत.तसेच महाविकास आघाडीतील नेतेही या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे उत्सुकतेने पाहत आहेत. त्यामागे कारण असं आहे, महाविकास आघाडीच्या  नेत्यांना विश्वास आहे की, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे-सरकारमध्ये फुट पडेल. शिंदे यांच्या पक्षातील अनेक अस्वस्थ आमदार मंत्रीपद न मिळाल्याने पुन्हा एकदा बंडखोरी करणार, अशी वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहेत. शिवाय शिवसेना नेत्यांनी सन 2023 मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार, असाही दावा केला आहे. 

नाराज नेते आनंदी होणार 

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार होईल,' असे आशिष जैस्वाल म्हणाले. दरम्यान, पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये औरंगाबादचे संजय शिरसाट; तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची नाराजी वारंवार दिसून आली. बच्चू कडू यांनी तर मोठे शक्तिप्रदर्शन केले.

त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या किती आमदारांना आगामी टप्प्यात मंत्रीपद मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या विस्तारावेळी ते आनंदी होतील का असा प्रश्न आपल्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील पडला असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी