Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होणार या तारखेला; किती आमदारांचा होणार शपथविधी?

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 14, 2022 | 14:46 IST

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं. यानंतर वादळी वेगाने राज्यातील राजकारणात घडामोड होत शिंदे-फडणवीस सरकार आलं. त्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

The expansion of the Shinde-Fadnavis government will take place on this day
या दिवशी होणार शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता
  • भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेणार
  • शिंदे गटानं 20 मंत्रिपदांची मागणी केली पण त्यांना 15 मंत्रिपदे मिळणार

Cabinet Expansion : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं. यानंतर वादळी वेगाने राज्यातील राजकारणात घडामोड होत शिंदे-फडणवीस सरकार आलं. त्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु बाकी मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यानं आमदारांचा शपथविधी बाकी राहिला आहे.  


दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपासून शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाबाबत चर्चा रंगल्या आहेत. आता या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. या दिवशी भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. 
शिंदे गटानं 20 मंत्रिपदांची मागणी केली आहे. पण त्यांना 15 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला दोन्ही बाजूंचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. 

Read Also : Electric highway नाम तो सुना होगा; नाही, मग फायदेही ऐका

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एरव्ही आम्हाला मार्गदर्शन करणारे राज्यपाल आता कुठे गेले? असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला आहे. तसेच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गट फुटेल, असं म्हणत खैरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नेमणुकांची प्रतिक्षा 

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन बारा दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही मुख्यमंत्री कार्यालय सुरू झालेलं नाही. राज्यातील नागरिकांना त्यांच्या समस्यांवर दाद मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आशेचा किरण असतं. पण गेल्या 12 दिवसांपासून मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारीच उपस्थित नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी