Nawab Malik vs Sameer Wankhede :  समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा आणखी एक फर्जीवाड्याचा पुरावा मलिकांकडून सादर 

Sameer Wankhede Documents : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (nawab mailk) यांचा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील हल्लाबोल सुरुच आहे.

cabinet minister nawab malik shares another documents of ncb zonal director sameer wankhede that he is muslim
नवाव मलिक यांनी फोडला आणखी एक बॉम्ब 
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (nawab mailk) यांचा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील हल्लाबोल सुरुच आहे.
  • समीर वानखडे यांच्या आईची नोंद मृत्यूनंतर आधी मुस्लिम मग हिंदू याबाबत नवाब मलिक यांनी ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे. 
  • मुंबई महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे.

 Sameer Wankhede Documents। मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (nawab mailk) यांचा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील हल्लाबोल सुरुच आहे. “आणखी एक फर्जीवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव” असं ट्वीट करत मलिक यांनी ट्विटरवरुन काही कागदपत्र सोशल मीडियावर पोस्ट  केली आहेत. समीर वानखडे यांच्या आईची नोंद मृत्यूनंतर आधी मुस्लिम मग हिंदू याबाबत नवाब मलिक यांनी ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे. 

दरम्यान अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना आपल्या कुटुंबाविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करणारा आदेश देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने फेटाळल्याने त्याला समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडेंनी बुधवारी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर अपिलाद्वारे आव्हान दिले आहे.  या अपिलावर आज, गुरुवारी न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होणार आहे.

काय आहेत कागदपत्रं?

मुंबई महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं नवाब मलिक यांनी शेअर केली आहेत.


मी अनुसूचित जमाती वर्गात मोडत असून माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केले. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं.

वानखेडेंवर मलिकांचा फोटोबॉम्ब

समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक सातत्याने करत आहेत. त्यासंदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम धर्मगुरुंच्या समोर निकाह नामावर सही करताना दिसत होते.

वानखेडेंच्या वडिलांची कोर्टात धाव

समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. नवाब मलिक यांच्याविरोधात त्यांनी सव्वा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी