क्या बात, क्या बात ! कोणताही ट्रेड घेऊन ITI उत्तीर्ण उमेदवारांना थेट मिळेल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 06, 2022 | 14:20 IST

आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आयटीआय केलेल्या उमेदवारांना आता इंजिनिअरिंग करता येणार आहे. तेही कोणत्याही ट्रेडमधून आयटीआयचे शिक्षण (ITI Education) पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी दिली. 

Candidates who have passed ITI will be able to take engineering education
ITI उत्तीर्ण उमेदवारांना घेता येणार इंजिनीअरिंगचं शिक्षण   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पोलिटेक्निक प्रवेशाची एक फेरी गेल्यावर्षी कोरोनामुळे कमी करण्यात आली होती. यंदा मात्र एक फेरी वाढविण्यात येणार
  • पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या तीन फेऱ्या असणार आहेत.
  • मातृछत्र आणि पितृछत्र हरवालेल्या विद्यार्थ्यांना २६० पोलटेक्निक कॉलेजमध्ये २ जागा राखीव असणार

Polytechnic Admission: आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आयटीआय केलेल्या उमेदवारांना आता इंजिनिअरिंग करता येणार आहे. तेही कोणत्याही ट्रेडमधून आयटीआयचे शिक्षण (ITI Education) पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी दिली. 

उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आज पदविका अभ्यासक्रम (पोलटेक्निक) प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ (Diploma Course (Polytechnic) Admission Process 2022-23) ऑनलाइन प्रणाली पोर्टलच्या उद्घाटनाप्रसंगी शिक्षणमंत्री उदय सामंत बोलत होते. पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या तीन फेऱ्या असणार आहेत. पोलिटेक्निक प्रवेशाची एक फेरी गेल्यावर्षी कोरोनामुळे कमी करण्यात आली होती. यंदा मात्र एक फेरी वाढविण्यात येणार असून तंत्रशिक्षण विभागाकडून यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले. तसेच पोलटेक्निकमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण चांगली टेक्नॉंलॉजी देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहावीचा निकाल जाहीर होण्याआधी १५ दिवस आपण पोलटेक्निक अभ्यासक्रमाचा फॉर्म भरणार आहोत. दहावी निकाल जाहीर झाल्यानंतर या पोर्टलवर बोर्डाकडून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे मार्क अपलोड होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुन्हा कागदपत्र घेऊन फिरण्याचा त्रास कमी होणार आहे. मातृछत्र आणि पितृछत्र हरवालेल्या विद्यार्थ्यांना २६० पोलटेक्निक कॉलेजमध्ये २ जागा राखीव असणार आहेत. तसेच काश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात शिक्षण घेण्याचा निर्णय अडीच वर्षांपुर्वीच महाराष्ट्र सरकारने घेतल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच दिल्लीतील जुने महाराष्ट्र युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्याचा निर्णय शिक्षणविभागाने घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीत दुसऱ्या कोणाच्या आश्रयाची गरज नसेल असेही ते म्हणाले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी