संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल ; सोमय्यांनी केली होती तक्रार

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 25, 2022 | 07:02 IST

शिवसेना (Shiv Sena ) खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते (BJP leader) किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्या तक्रारीवरून 'लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस' आणि त्यांच्या भागीदारांविरुद्ध हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

A case has been registered against Sujit Patkar
सुजित पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कंपनी अस्तित्वात नसून केवळ कंत्राट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे तयार करण्यात आल्याचा आरोप.
  • आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबईः शिवसेना (Shiv Sena ) खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते (BJP leader) किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्या तक्रारीवरून 'लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस' आणि त्यांच्या भागीदारांविरुद्ध हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

किरीट सोमय्या काही दिवसांपासून कोरोनाकाळात दिलेल्या वेगवेगळ्या कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत होते. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांनी मुंबईतील वेगवेगळ्या जम्बो कोरोना केंद्रात जून २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत वैद्यकीय सेवा पुरविण्याकरिता काढलेल्या निविदा मिळविण्यासाठी 'लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस' ही कंपनी स्थापन केली.

Read Also : आलिया भट्टवर बॉडी शेमिंगमुळे 'हा' अभिनेता ट्रोल

ही कंपनी अस्तित्वात नसून केवळ कंत्राट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे तयार करण्यात आली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला. सुजित पाटकर यांच्यासह लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंटचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांनी मिळून ३८ कोटी रुपयांचा घोटाळा केला, असे सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Read Also : 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वेबसीरिजचा फर्स्ट लूक

कंपनीकडे वैद्यकीय मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव व ज्ञान नसतानाही अनुभव असल्याचे बसवून कंत्राट मिळवल्याचेही सोमय्या यांच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी सुजित पाटकर आणि इतर भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी