CBI and ED registered cases against Ex CP Mumbai Sanjay Pandy : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास संस्थांनी संजय पांडे यांच्या विरोधात तक्रारी नोंदविल्या आहेत. संजय पांडे यांच्या विरोधात आतापर्यंत सीबीआयने ३ आणि ईडीने २ एफआयआर नोंदविल्या आहेत. एनएसईच्या कर्मचाऱ्यांच्या फोनचे २००९ ते २०१७ या कालावधीत बेकायदेशीरपणे टॅपिंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
एनएसईच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे या दोघांविरोधात बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात कारवाई सुरू आहे. एनएसईचे माजी सीईओ आणि एमडी रवी नारायण यांच्या विरोधातही कारवाई सुरू आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे घरात नाहीत. ते कुठे आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण संजय पांडे यांच्याशी संबंधित १० ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे. मुंबई आणि पुण्यासह वेगवेगळ्या भागांमध्ये धाडी पडल्या आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.