Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेज आले समोर, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 04, 2023 | 10:35 IST

Sandeep Deshpande Attack : मनसे (MNS) नेते  (Leader)संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande ) यांच्यावरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. शिवाजी पार्कात  देशपांडे (Sandeep Deshpande) यांना काल (3 मार्च) चार जणांकडून मारहाण झाली होती.

CCTV footage of Sandeep Deshpande's attack
संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
  • संदीप देशपांडे यांच्यावर काल दादरच्या शिवाजी पार्कात हल्ला झाला होता.
  • गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 8 पथके तैनात केली आहेत.

Sandeep Deshpande Attack: मनसे (MNS) नेते  (Leader)संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande ) यांच्यावरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. शिवाजी पार्कात  देशपांडे (Sandeep Deshpande) यांना काल (3 मार्च) चार जणांकडून मारहाण झाली होती. या आरोपींचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. तर गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोन जणांना भांडूपमधून ताब्यात घेण्यात आले आहे.  (CCTV footage of Sandeep Deshpande's attack;police have taken custody two person)

अधिक वाचा  : घरी बनवा पनीर- मूगदाळीचे धिंडरे

या दोघांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केलाय का? त्यांनी हल्ला का केला? हल्ल्यामागचा मास्टरमाइंड कोण आहे? संदीप देशपांडे यांच्यासोबत यांचं पूर्ववैमनस्य होतं का? हे दोघेही कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का? याची माहिती गुन्हे अन्वेषण विभाग त्यांच्याकडून मिळवणार आहेत.

अधिक वाचा  : श्री रामाच्या नावावर ठेवा आपल्या मुलाचं नाव

आरोपीच्या चौकशीनंतर हल्लामागील सत्य सर्वांसमोर येईल. संदीप देशपांडे यांच्यावर काल दादरच्या शिवाजी पार्कात हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 8 पथके तैनात केली. या प्रकरणी दोन सीसीटीव्ही फुटेज हाती आल्यानंतर पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत शोध मोहीम हाती घेतली होती. 

अधिक वाचा  : पूर्ण आयुष्यभर याराना ठेवतात असे मित्र

हल्ल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. मनसे नेत्यांनी हल्ल्याप्रकरणी थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या चौकशीची मागणी केली आहे. तर नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्याकडे बोट दाखवले आहे. 

राजकीय वादातून हल्ला? 

 गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे आडनाव समोर आली आहेत. यातील एका आरोपीचं आडनाव सोळंकी तर दुसऱ्याचं खरात असल्याचं सांगितलं जात आहे. तो शिवसेनेशी संबंधित आहे की नाही याची चौकशी करण्यात येत आहे. हे दोन्ही आरोपी  भांडूप परिसरातील असल्याचं सांगितलं जातं. राजकीय वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटलं जातं आहे.

अधिक वाचा  : मुलं असं करत असतील तर प्रेमात तुमचाही दिग्यासारखा गेम होणार

संदीप देशपांडे हे सातत्याने राजकीय विधाने करत होते. त्यामुळेच हा हल्ला झाला असल्याचा संशय आहे.  दरम्यान, संदीप देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते त्यांच्यावर हल्ला कुणी केला याची माहिती देण्याची शक्यता आहे. तसेच या हल्ल्याच्या अनुषंगाने संदीप देशपांडे आणखी नवी माहिती देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी