Guidelines For Christmas : नाताळ साध्या पद्धतीने साजरा करा, गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 24, 2021 | 17:14 IST

Celebrate Christmas in a simple way, maharashtra home department guidelines : यंदा शनिवार २५ डिसेंबर २०२१ रोजी नाताळ अर्थात ख्रिसमस या ख्रिस्ती बांधवांच्या सणासाठी राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Celebrate Christmas in a simple way, maharashtra home department guidelines
नाताळ साध्या पद्धतीने साजरा करा, गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना 
थोडं पण कामाचं
 • नाताळ साध्या पद्धतीने साजरा करा, गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
 • नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, राज्य शासनाचे आवाहन
 • नाताळ अर्थात ख्रिसमस या ख्रिस्ती बांधवांच्या सणासाठी मार्गदर्शक सूचना जारी

Celebrate Christmas in a simple way, maharashtra home department guidelines : मुंबई : महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉनचे संकट आहे. यामुळे यंदा शनिवार २५ डिसेंबर २०२१ रोजी नाताळ अर्थात ख्रिसमस या ख्रिस्ती बांधवांच्या सणासाठी राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 1. कोरोना आणि ओमायक्रॉन संकटाचे भान राखा. सण साजरा करण्याच्या निमित्ताने का होईना पण मोठ्या प्रमाणात एकत्र येणे, एकत्र जमणे टाळा. नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करा.
 2. नाताळ / ख्रिसमस निमित्ताने चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्के पर्यंत लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. 
 3. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर (Social Distancing) राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच चर्चमध्ये निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
 4. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे. ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.  
 5. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा (Choiristers) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. 
 6. चर्चच्या बाहेर/ परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नयेत. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. 
 7. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटकोर पालन करण्यात यावे.
 8. नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष नाताळ उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी