Coal Supply : मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यात कोळसा तुटवडा निर्माण झाला असून राज्यावर लोडशेडिंगची टांगती तलवार आहे. परंतु महाराष्ट्राला मुबलक प्रमाणात कोळसा पुरवठा होत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे महाराष्ट्रात लोडशेडिंग होणार नाही असे चिन्ह आहे.
दिनांक 13 एप्रिलला महाराष्ट्रात 24 हजार 600 मे.वॅ. विजेची मागणी होती. या अडचणीच्या काळातही 23 हजार 100 मे.वॅ पर्यंत विजेचा पुरवठा केला. तुमच्यापर्यंत अखंडित वीज पोहचविण्यासाठी आमचे अथक प्रयत्न आणि नियोजन सुरू आहे. pic.twitter.com/dJfQtWXJQb
— Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@MSEDCL) April 14, 2022
महाराष्ट्र सरकारला सध्या मार्च महिन्याच्या तुलनेत अधिक कोळसा पुरवठा प्राप्त होत असल्याचे कोळसा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्ताला उत्तर देताना, मंत्रालयाने सांगितले की, सद्यस्थितीत राज्य त्यांची कोळशाची गरज भागवत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना (टीपीपी) 70.77 दशलक्ष टन (एमटी ) कोळशाचा पुरवठा करण्यात आला.
भारनियमनाच्या फसव्या संदेशाला बळी पडू नका. महावितरण सदैव आपल्यासाठी. राज्यात सद्यःस्थितीत कुठेही नियोजित भारनियमन नाही. pic.twitter.com/RZS4EYVMDz
— Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@MSEDCL) April 15, 2022
विजेच्या मागणीत होत असलेल्या वाढीनुसार औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा वाढवला जात आहे, असे कोळसा मंत्रालयाने सांगितले. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये, महाराष्ट्रातील वीज प्रकल्पांना दररोज 2.14 लाख टन कोळशाचा पुरवठा होत होता.हा कोळसा पुरवठा या महिन्यात/एप्रिल, 11.04.2022 पर्यंत दररोज 2.76 लाख टन पर्यंत वाढला आहे.
महाराष्ट्रावरच नाही तर देशावर कोसळले आहे विजेचे संकट. मात्र वीज बचत आणि व्यवस्थापन करून या संकटावर करूया मात. यात महावितरणला हवी ग्राहकांची साथ. pic.twitter.com/93fTX0BwDE
— Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@MSEDCL) April 15, 2022
महाजेनकोला 2021-22 मध्ये 37.131 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला आहे. महाजेनकोला मार्च - 22 मध्ये होणारा दैनंदिन कोळसा पुरवठा 0.96 लाख टन प्रतिदिन होता जो एप्रिलमध्ये (11.04.22 पर्यंत) 1.32 लाख टन प्रतिदिन झाला आहे.महाजेनकोकडे सुमारे 2390 कोटी रुपयांची थकबाकी असतानाही महाराष्ट्राची कोळशाची गरज भागवली जात आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.