Mumbai Jumbo Mega Block : मध्य रेल्वेवर ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान ७२ तासांचा मेगाब्लॉक, ठाणे ते दिवा दरम्यान नव्या मार्गिका सुरू होणार 

ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी मार्गिका सुरू होते आहे, ही मार्गिका खुली करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन एक्सप्रेस गाड्यांना स्वंतत्र मार्गिका सुरू करण्यात येणार आहे.

थोडं पण कामाचं
  • ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी मार्गिका सुरू होते आहे
  • मध्य रेल्वेकडून तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक
  • मुंबई ठाणे परिसरातून प्रवास करणार्‍यांचा वेळ वाचणार

Mumbai Jumbo Mega Block : मुंबई : ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी मार्गिका सुरू होते आहे, ही मार्गिका खुली करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन एक्सप्रेस गाड्यांना स्वंतत्र मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे एक्सप्रेस गाड्यांना वेगळी मार्गिका मिळणार आहे आणि लोकल सेवा अधिक जलद होणार आहे. त्यामुळे मुंबई ठाणे परिसरातून प्रवास करणार्‍यांचा वेळ वाचणार आहे. 

२३ जानेवारीला मेगाब्लॉक

ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या सहाव्या मार्गिकेच्या कामांना अंतिम स्वरूप दिले जात आहे. २३ जानेवारीला १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. २३ जानेवारी रोजी मध्य रात्री १.२० वाजल्यापासून ते दुसर्‍या दिवशी दुपारी ३.२० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या दिवशी ३०० हून अधिक लोकल फेर्‍या रद्द करण्यात येतील. 


तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक

या मेगाब्लॉक नंतर ७२ तासांचा सर्वात मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ४ फेब्रुवारी शुक्रवार ते  रविवार ६ फेब्रुवारी पर्यंत घेतला जाणार आहे. या जम्बोमेगाब्लॉक दरम्यान लोकल फेर्‍या कमी असतील तसेच याचा परिणाम एक्सप्रेस गाड्यांवरही होणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे, कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेकडून ज्यादा बस सोडण्यात येणार आहे. तसेच ज्या स्थानकांवर लोकल थांबणार नाही प्रवाशांना इतर स्थानकातून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. 

५० नव्या लोकल सेवा 

मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच सुकर होणार आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी ५० नव्या लोकल सेवा दाखल होणार आहेत. ९ जानेवारी रोजी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता, हा मेगाब्लॉक संपला आहे. तसेच ठाणे ते दिवादरम्यान मुख्य मार्गावरी धीम्या गाड्यांसाठी ९ किमीचा नवा कॉरिडर तयार झाला आहे.  धीम्या लोकल या नव्या मार्गिकेवर धावत आहेत. मध्य रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेसाठी १४, ८, आणि ७२ तासांचा मेगाब्लॉक बाकी आहे. यापैकी ७२ तासांचा मेगाब्लॉक फेब्रुवारीमध्ये होणार आहे. त्यानंतर या मार्गिकेवर लोकलच्या नव्या ५० सेवा सुरू होणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी