Central Railway AC local trains full Schedule : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/टिटवाळा/अंबरनाथ दरम्यान बारा एसी लोकलच्या फेऱ्या शनिवार १४ मे २०२२ पासून वाढणार आहेत. या संदर्भातील संपूर्ण वेळापत्रक मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आले आहे. मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरवरून दिली माहिती.
कमी झालेले तिकिटांचे दर आणि वाढता उन्हाळा यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एसी लोकलच्या प्रतिसादात वाढ झाली आहे. तिकिटांचे नवे दर लागू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एसी लोकलची दररोजची सरासरी प्रवासीसंख्या २८ हजार १४१ झाली आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मुख्य मार्गावरील एसी लोकलच्या संख्येत वाढ करण्याचा आणि हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसी लोकलच्या संदर्भात नवे निर्णय घेतल्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एसी लोकलची संख्या ४४ वरून ५६ होणार आहे. हार्बरवरील एसी लोकलच्या वेळांमध्ये सामान्य लोकल धावणार असल्यामुळे हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या संख्येत वाढ होणार आहे. हा बदल झाला तरी मध्य रेल्वे कोणतीही नवी लोकल फेरी सुरू करत नसल्यामुळे लोकल फेऱ्यांची दैनंदिन संख्या १८१० एवढीच राहणार आहे.
AC local Time Table @Central_Railway pic.twitter.com/VTatVhBODt
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) May 13, 2022
हार्बरवरील एसी लोकलचा मासिक आणि त्रैमासिक पास काढलेल्यांना पासची मुदत संपेपपर्यंत सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातून अर्थात फर्स्ट क्लासमधून प्रवास करता येणार आहे. जितक्या दिवसांचा पास शिल्लक आहे, तितक्या दिवसांच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी भाडे फरकाचा परतावा रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवरून मिळेल, असे मध्य रेल्वेने जाहीर केले.
उष्णतेवर करा मात, देऊन मध्य रेल्वेच्या एसी लोकलची साथ! pic.twitter.com/ttMQ7fzuHR
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) May 13, 2022
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.