Mega Block : उद्या मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान मेगाब्लॉक, अनेक एक्सप्रेस दुसर्‍या मार्गावर वळवणार

रविवारी १९ जून रोजी मध्य रेल्वेवर कल्याण ते कुर्ला दरम्यान्न ५ व्या आणि ६ व्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक एक्सप्रेस दुसर्‍या मार्गावर वळवण्यात येणार असून १० ते १५ मिनिटे उशीरा धावणार आहेत.

mega block
मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रविवारी १९ जून रोजी मध्य रेल्वेवर कल्याण ते कुर्ला दरम्यान्न ५ व्या आणि ६ व्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • यावेळी अनेक एक्सप्रेस दुसर्‍या मार्गावर वळवण्यात येणार असून १० ते १५ मिनिटे उशीरा धावणार आहेत.
  • रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान कल्याण ते कुर्ला दरम्यान ५ व्या आणि सहाव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Megablock : मुंबई : रविवारी १९ जून रोजी मध्य रेल्वेवर कल्याण ते कुर्ला दरम्यान्न ५ व्या आणि ६ व्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक एक्सप्रेस दुसर्‍या मार्गावर वळवण्यात येणार असून १० ते १५ मिनिटे उशीरा धावणार आहेत. उद्या रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान कल्याण ते कुर्ला दरम्यान ५ व्या आणि सहाव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे खालील एक्सप्रेस गाड्या १० ते १५ मिनिटे उशीरा धावणार आहेत.

11010 Pune- Mumbai Sinhagad Express, 17611 Hazur Sahib Nanded-Mumbai Rajya Rani Express, 12124 Pune- Mumbai Deccan Queen, 13201 Patna-LTT Express, 17221 Kakinada-LTT Express, 22160 Chennai-Mumbai Express, 12168 Banaras- LTT Express, 12321 Howrah- Mumbai Mail via Prayagraj, 12812 Hatia- LTT Express and 11014 Coimbatore- LTT Express


11055 LTT- Gorakhpur Express and 11061 LTT-Jaynagar Express will be diverted o­n Dn fast line between Kalyan and Thane Stations and will arrive Kalyan 10-15 minutes behind schedule.16345 LTT- Thiruvananthapuram Netravati Express will be diverted o­n Dn fast line between Thane and Diva and will run 10-15 minutes behind schedule.
 

हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर/वाशी या डाऊन मार्गावर सकाळी १०.३४ ते ३.३६ पर्यंत रेल्वे सेवा बंद असणार आहे. तर पनवेल/बेलापूर/वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या अप मार्गावर सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ पर्यंत रेल्वे सेवा बंद सणार आहे. या काळात कुर्ला आणि पनवेल वाशीवर विशेष ट्रान्स लोकल सेवा चालू असेल. ठाण-वाशी/नेरुळहून सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत प्रवाशांना या ट्रान्स रेल्वेसेवेने प्रवास करता येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी