central railway megablock between csmt to vidyavihar on sunday 19 march 2023 : मुंबईत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान रविवार 19 मार्च 2023 रोजी मेगाब्लॉक आहे. पण हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा मेगाब्लॉक नसेल. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर दरम्यान शनिवार-रविवार या काळात रात्रकालीन ब्लॉक असेल. या वेळात काही लोकल फेऱ्या रद्द होतील तर काही फेऱ्या विलंबाने धावतील.
कुर्ला येथील 8 मीटर रूंद पादचारी पुलासाठी (foot over bridge : FOB) पाच गर्डरप्लेट उभारण्यात येणार आहेत. यासाठी शनिवार 18 मार्च 2023 रोजी रात्री 11.50 ते रविवार 19 मार्च 2023 रोजी पहाटे 4.30 पर्यंत विक्रोळी ते माटुंगा अप जलद (फास्ट) आणि वडाळा रोड ते मानखुर्द डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. शेवटच्या लोकलच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी रात्री 11.14 ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि रात्री 11.08 ची वडाळा ते पनवेल ही शेवटची लोकल असेल.
11020 कोणार्क एक्स्प्रेस, 12810 हावडा-मुंबई मेल, 12134 मंगळुरू-मुंबई एक्स्प्रेस आणि 12702 हैद्रराबाद-मुंबई हुसैन सागर एक्स्प्रेस मुलुंड ते माटुंगादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे या गाड्या 15 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
पापमोचनी एकादशी, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी
9 लिफ्ट, 6 फ्लोअर पार्किंग; मुकेश अंबानींचे घर की मुंबईतला राजवाडा
मध्य रेल्वे मुख्य मार्ग अर्थात मेन लाईन : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus : CSMT) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर (स्लो रूटवर)
वेळ : रविवार 19 मार्च 2023 रोजी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 मेगाब्लॉक
परिणाम : ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील (स्लो रूटवरील) लोकल फेऱ्या जलद (फास्ट) मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द होतील.
Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे
प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करताना घ्यायची काळजी
पश्चिम रेल्वे : वसई रोड ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर (फास्ट रूटवर) मेगाब्लॉक
वेळ : शनिवार 18 मार्च 2023 रोजी रात्री 11.30 ते रविवार 19 मार्च 2023 रोजी पहाटे 04.45 पर्यंत
परिणाम : ब्लॉक काळात जलद मार्गावरील (फास्ट रूटवरील) लोकल फेऱ्या धीम्या (स्लो) मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द होतील. काही विलंबाने धावणार आहेत. रात्रकालीन ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
हे उपाय करा आणि Heart Attack चा धोका नैसर्गिकरित्या कमी करा
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.