Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 27, 2022 | 21:13 IST

Central Railway traffic disrupted : कल्याण : मध्य रेल्वेची कल्याण ते कसारा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Central Railway traffic disrupted
Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • वासिंद आणि आसनगाव दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल
  • वाहतूक सुरळीत होण्यास किमान एक तास लागण्याची शक्यता

Central Railway traffic disrupted : कल्याण : मध्य रेल्वेची कल्याण ते कसारा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वासिंद आणि आसनगाव दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक सुरळीत होण्यास किमान एक तास लागण्याची शक्यता आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

याआधी दादर आणि माटुंगा दरम्यान शुक्रवार १५ एप्रिल २०२२ रोजी रात्री चालुक्य एक्सप्रेस आणि गदग एक्सप्रेस यांची धडक झाली होती. या अपघातात चालुक्य एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून उतरले. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र या अपघातामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी