Chandrakant Patil Ink Attack: राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर राज्य सरकारचं पाऊल मागे; मानले फडणवीस अन् पाटलांचे आभार

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 13, 2022 | 08:24 IST

Chandrakant Patil Ink Attack: भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री (Minister of Higher and Technical Education) चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर पिंपरी-चिंचवड येथे शाई हल्ला झाल्यानंतर राज्य सरकारनं कडक कारवाई करत हल्लेखोराला पकडलं. त्या प्रकरणी पोलिसांवरही कारवाई करण्यात आली होती.

tate government takes a step back after Raj Thackeray's intervention
राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर राज्य सरकार एक पाऊल मागे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शाईफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी 307 हे कलम लावलं, तसेच 11 पोलिसांचे निलंबनही करण्यात आले होते.
  • काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, नागरी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना फोन करून राज ठाकरेंनी कारावाई बाबत चर्चा केली.

मुंबई  :  भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरील शाईफेक प्रकरणी झालेली कारवाई मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) पत्र लिहून चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले आहेत. भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री (Minister of Higher and Technical Education) चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर पिंपरी-चिंचवड येथे शाई हल्ला झाल्यानंतर राज्य सरकारनं कडक कारवाई करत हल्लेखोराला पकडलं. त्या प्रकरणी पोलिसांवरही कारवाई करण्यात आली होती.  (State government takes a step back after Raj Thackeray's intervention)

अधिक वाचा  :

महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेबत आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यांतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर शाईफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी 307 हे कलम लावलं, तसेच 11 पोलिसांचे निलंबनही करण्यात आले होते. राज्य सरकारची कारवाई ही अरेरावी करणारी वाटत असल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका केली होती. या प्रकरणात करण्यात आलेली कारवाई थांबविण्यात, यावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, नागरी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. 

अधिक वाचा  :

या प्रकरणात राज ठाकरे यांनी मध्यस्थी करून ही कारवाई मागे घेण्यात, यावी याची मागणी करावी असं पत्र या शिष्टमंडळाकडून देण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना फोन करून याबाबत चर्चा केली. राज ठाकरेंनी केलेल्या मागणीला मान देऊन राज्य सरकारने आरोपींवरील 307 हे कलम काढले तसेच पोलिसांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली. कारवाई मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटली यांचे आभार मानले आहेत. 

काय म्हटले आहे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात?

"लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली तर निषेध व्हायलाच हवा, आम्ही पण 'मनसे स्टाईल'ने अनेकवेळा निषेध नोंदवतो. पण है करताना काही संकेत असतात. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधानं करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरु आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे एखादं विधान आलं की त्याचे संदर्भ न तपासता कार्यकर्त्यांना भडकवून, स्वतः नामानिराळं राहण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढायला लागलेत. मग यांचे कार्यकर्ते पण कसलाच विचार न करता, कसलीही खातरजमा न करता, वाट्टेल त्या मार्गाने निषेध करत सुटतात. असाच प्रकार, राज्यातील विद्यमान मंत्री, भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत घडला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी