Maharashtra HSC : बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 30, 2022 | 21:04 IST

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (बोर्डाने) बारावीच्या पुरवणी परीक्षेचे ६ ते १० आणि १२ ऑगस्ट या दिवशी होणार असलेले सर्व पेपर पुढे ढकलले आहेत.

Change in Maharashtra HSC Supplementary Examination Time Table
Maharashtra HSC : बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Maharashtra HSC : बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
  • बारावीच्या पुरवणी परीक्षेचे ६ ते १० आणि १२ ऑगस्ट या दिवशी होणार असलेले सर्व पेपर पुढे ढकलले
  • माहिती mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध

Change in Maharashtra HSC Supplementary Examination Time Table : महाराष्ट्रात बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै २०२२ पासून सुरू आहे. ही परीक्षा जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार १२ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी  संपणार होती. पण काही परीक्षांच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला आहे. राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (बोर्डाने) बारावीच्या पुरवणी परीक्षेचे ६ ते १० आणि १२ ऑगस्ट या दिवशी होणार असलेले सर्व पेपर पुढे ढकलले आहेत. या संदर्भातील माहिती mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

सुधारित वेळापत्रक

बोर्डाच्या निर्णयानुसार शनिवार ६ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असलेले सर्व पेपर आता सोमवार २२ ऑगस्ट २०२२ रोजी होतील. तसेच बुधवार १० ऑगस्ट २०२२ रोजी होणार असलेले सर्व पेपर आता मंगळवार २३ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहेत. तसेच शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असलेले सर्व पेपर आता बुधवार २४ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहेत.  विद्यार्थ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि त्यानुसार परीक्षेसाठी यावी, असे बोर्डाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी