मुंबईकर मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट मार्गात बदल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 02, 2022 | 13:10 IST

Changes in the best route for the convenience of Mumbaikar Metro passengers : आज (शनिवार २ एप्रिल २०२२) गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर दहिसर पश्चिम ते डहाणूकर वाडी मेट्रो २ अ आणि आरे ते दहिसर पूर्व मेट्रो ७ हे दोन मेट्रो मार्ग सुरू होत आहेत. मेट्रो मार्गांवर प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी बेस्टने काही बस मार्गांमध्ये बदल केले आहेत.

Changes in the best route for the convenience of Mumbaikar Metro passengers
मुंबईकर मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट मार्गात बदल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईकर मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट मार्गात बदल
  • दहिसर पश्चिम ते डहाणूकर वाडी मेट्रो २ अ आणि आरे ते दहिसर पूर्व मेट्रो ७ हे दोन मेट्रो मार्ग सुरू होत आहेत
  • मेट्रो मार्गांवर प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी बेस्टने काही बस मार्गांमध्ये बदल

Changes in the best route for the convenience of Mumbaikar Metro passengers : मुंबई : आज (शनिवार २ एप्रिल २०२२) गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर दहिसर पश्चिम ते डहाणूकर वाडी मेट्रो २ अ आणि आरे ते दहिसर पूर्व मेट्रो ७ हे दोन मेट्रो मार्ग सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यात दोन्ही मार्गांवरून नऊ स्टेशनवरून प्रत्येकी नऊ किलोमीटरचा प्रवास मुंबईकर करू शकतील. या मेट्रो मार्गांवर प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी बेस्टने काही बस मार्गांमध्ये बदल केले आहेत. यामुळे घर वा ऑफिसमधून मेट्रो स्टेशन गाठणे तसेच मेट्रो स्टेशनवरून घर वा ऑफिस गाठणे सोयीचे होईल. 

मेट्रोच्या दोन नव्या मार्गांवर शून्य ते तीन किमी अंतरासाठी दहा रुपये आणि त्यापेक्षा जास्त अंतरासाठी वीस रुपये आकारले जातील. ही व्यवस्था गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होत असलेल्या नऊ-नऊ किमी अंतराच्या दोन नव्या मेट्रो मार्गांसाठी आहे.

  1. दहिसर – घरटन पाडा – ७००, ७०६, ७१८
  2. अप्पर दहिसर – सेंट मेरी स्कूल, विठ्ठल रुक्मिणी मंदिर – २०७. २०९, सी १२
  3. कांदरपाडा – ऋषी संकुल – सी १२, ए.२४०, ए-२४५
  4. मंडपेश्वर – सरदार दल्लभभाई पटेल महाविद्यालय- सी १२, , ए-२४५
  5. एक्सर – शांती आश्रम, एसके रिसॉर्ट – सी १२
  6. बोरिवली पश्चिम – डॉन बॉस्को – सी १२, २०२, २२४, २२६, २४४, २४६, २४७, २६९, २७७, २९४, ४६१, ७२०
  7. पहाडी एक्सर- शिंपवलीगाव – २४५, २४७, २९४, २९६
  8. कांदिवली – कामराज नगर – २२३, २८०, सी-१२
  9. डहाणुकरवाडी – डहाणुकरवाडी – २०४, २०६, २०७, २४४, २४६, २८०, २८१, २८६, ४६०
  10. ओवरीपाडा – जय महाकाली मंदिर – २९७, २९८, ७००, ७०७, ७१८
  11. राष्ट्रीय उद्यान – ओंकारेश्वर मंदिर – १८८, २९३, २९७, २९८, २९९, ४७०, ४७८, ४९८, ५२४, ६२९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०५, ७०६, ७०९, ७१०, ७१८, अ-६०
  12. देवीपाडा – देवीपाडा – ४७०, ४७८, ४७९, ४९८, ५२४, ७०१, ७०२, ७०३, ७०५, ७०६, ७०९, ७१०, ७१८
  13. मागाठणे – मागाठणे दूरध्वनी केंद्र – २०९, २२३, २२६, ४४०, ४६१, ४७०, ४७८, ४७९, ४९८, ५२४, ६२९, ७०१, ७०३, ७०५, ७०६, ७१८
  14. पोयसर – बी. एच. ए. डी – २२६, ४४०, ४६१, ४७०, ४७८, ४९८, ५२४, ७०१, ७०५, ७०६, ७१८, सी-७१, सी-७२, ए-३००, ए-६०
  15. आकुर्ली – बाण डोंगरी – २८२, २८९, ए२८७, ए-२८८, ए३००
  16. कुरार – पुष्पा पार्क – ६२४, २८१
  17. दिंडोशी – पठाणवाडी – ३४५, ६०१
  18. आरे – विरवाणी इस्टेट – ३२६, ३२७, ३४३, ३४४, ३४६, ३४९, ३९८, ४६०, ४८९

अ. बसमार्ग क्र. ए-६४७ - शिवशाही प्रकल्प ते आरे मेट्रो स्थानक दरम्यान नागरी निवारा प्रकल्प, सामना परिवार, वाघेश्वरी मंदिर, गोकुळधाम मार्केट, दिंडोशी आगार, विरवाणी इस्टेट, गोरेगांव चेकनाका मार्गे प्रवर्तित

बसमार्ग क्र. ए-६४७चे बसथांबे – गोरेगांव चेकनाका क्र.१ , विरवाणी इस्टेट, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग नाका, दिंडोशी बसस्थानक, सत्र न्यायालय दिंडोशी, गोकुळधाम मार्केट, वाघेश्वरी मंदिर, सामना परिवार, सुयश शॉपिंग सेंटर, नागरी निवारा, संकल्प सोसायटी, इन्फिनीटी, आय. टी. पार्क, मैत्री सोसायटी - नागरी निवारा विभाग १ व २, सातपुडा सोसायटी, शिवशाही प्रकल्प / मंत्री पार्क

ब. बसमार्ग क्र.२७४ – कांदिवली स्थानक (प) आणि बंदर पाखाडी दरम्यान डहाणुकरवाडी मेट्रो स्थानकाजवळून प्रवर्तित

बसमार्ग क्र.२७४चे बसथांबे – कांदिवली स्थानक (प), देना बँक, काळा मारुती मंदिर, महात्मा गांधी तरण तलाव, कांदिवली गाव, वैशाली भवन, डहाणुकरवाडी मेट्रो स्थानक, कामराजनगर, ज्ञानेश्वर विद्यालय, नेताजीनगर पब्लिक स्कुल, बंदर पाखाडीगांव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी