Bhavana Gawli : ५५ कोटींचा साखर कारखाना ७.०९ कोटीत खरेदी करणाऱ्या शिवसेना खासदार भावना गवळींविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 08, 2022 | 05:30 IST

Chargesheet filed against Shiv Sena MP Bhavana Gawli for buying sugar factory worth Rs 55 crore for Rs 7.09 crore : सहकार क्षेत्रातील नवा घोटाळा चर्चेत आला आहे. यावेळी भ्रष्टाचाराचा आरोप शिवसेनेच्या महिला खासदारावर झाला आहे. ५५ कोटी रुपयांचा साखर कारखाना अवघ्या ७.०९ कोटी रुपयांत खरेदी करणाऱ्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या विरोधात इडीने आरोपपत्र दाखल केले.

Chargesheet filed against Shiv Sena MP Bhavana Gawli for buying sugar factory worth Rs 55 crore for Rs 7.09 crore
शिवसेना खासदार भावना गवळींविरोधात आरोपपत्र दाखल 
थोडं पण कामाचं
  • ५५ कोटींचा साखर कारखाना ७.०९ कोटीत खरेदी करणाऱ्या शिवसेना खासदार भावना गवळींविरोधात आरोपपत्र दाखल
  • किरीट सोमय्या यांनी केलेली सखोल चौकशीची मागणी
  • ३५ एकर जमीन भावना गवळींच्या कुटुंबातील सदस्यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टने ८ लाखांत खरेदी केली

Chargesheet filed against Shiv Sena MP Bhavana Gawli for buying sugar factory worth Rs 55 crore for Rs 7.09 crore : मुंबई : सहकार क्षेत्रातील नवा घोटाळा चर्चेत आला आहे. यावेळी भ्रष्टाचाराचा आरोप शिवसेनेच्या महिला खासदारावर झाला आहे. ५५ कोटी रुपयांचा साखर कारखाना अवघ्या ७.०९ कोटी रुपयांत खरेदी करणाऱ्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या विरोधात इडीने आरोपपत्र दाखल केले.

भावना गवळी ज्या सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डवर होत्या तो कारखाना कागदोपत्री दिवाळखोरीत असल्याचे दाखवण्यात आले. यानंतर हा कारखाना भावना गवळी यांनी ७.०९ कोटी रुपयांत खरेदी केला. धक्कादायक म्हणजे दिवाळखोरीची प्रक्रिया राबवून कारखान्याचा लिलाव करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी भावना गवळीच होत्या. त्यांनीच स्थापन केलेल्या भावना अॅग्रो प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने ७.०९ कोटी रुपयांत साखर कारखाना खरेदी केला. 

याआधी भावना गवळी यांचे वडील पुंडलीक गवळी यांनी १९९२ मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी साखर कारखाना स्थापन केला. शेतकऱ्यांचा सहकारी संघ स्थापन करुन कारखाना उभारण्यात आला. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाकडून २९ कोटी आणि महाराष्ट्र शासनाकडून १४ कोटींचे अनुदान घेण्यात आले होते. पुढे कारखान्याच्या बोर्डवर भावना गवळी आल्या. त्यांच्या कार्यकाळात कारखान्यासाठी स्टेट बँकेकडून ११ कोटींचे कर्ज काढण्यात आले. सुमारे ५५ कोटींचा निधी उभा करुनही कारखाना दिवाळखोरीत गेला असे कागदोपत्री दाखवले गेले. यानंतर भावना गवळी यांच्या खासगी कंपनीने ७.०९ कोटी रुपयांत साखर कारखाना खरेदी केला. यामुळे शेतकऱ्यांनी सहकारातून उभारलेला साखर कारखाना आता भावना गवळींच्या खासगी कंपनीच्या मालकीचा झाला आहे. 

भावना गवळी यांनी बँका आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था यांच्याकडून १०० कोटींचा निधी घेऊन त्याचा गैरवापर केला आणि सहकारी साखर कारखाना स्वतःच गिळंकृत केला; असे आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केले. या प्रकरणात प्राथमिक चौकशी केल्यावर तथ्य आढळल्यामुळे इडीने सखोल चौकशी केली. चौकशीअंती इडीने शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. 

सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची ३५ एकर जमीन भावना गवळींच्या कुटुंबातील सदस्यांनी स्थापन केलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टने फक्त आठ लाख रुपयांत खरेदी केली. नंतर ट्रस्टचे रुपांतर एका खासगी कंपनीत करण्यात आले. कंपनीच्या बोर्डवर भावना गवळी यांची आई शालिनी आणि सईद खान नावाच्या एका व्यक्तीची नियुक्ती झाली. या प्रकरणातही इडीच्या चौकशीमुळे भावना गवळी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Anandrao Adsul : आनंदराव अडसूळांच्या अटकपूर्व जामिनावर २५ जानेवारीला सुनावणी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी