म्हणून लॉकडाऊनच्या काळात छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 04, 2020 | 16:37 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळांनी सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर या भेटीचे फोटो पोस्ट केलेत

Sharad Pawar and chhagan bhujbal
म्हणून छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या 
सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन भुजबळांनी विभागाच्या कामाची संपूर्ण माहिती त्यांना दिली. 

अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेल्या उपाययोजना आणि केसरी रेशनकार्डधारकांना रेशनचे धान्य मिळावे याबाबत घेतलेले निर्णय याची संपूर्ण माहिती छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना दिली.

छगन भुजबळांनी सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर या भेटीचे फोटो पोस्ट केलेत.  छगन भुजबळ यांनी त्यांच्या खात्याकडून कोरोना संदर्भात जनतेला कशा प्रकारे मदत केली जात आहे याची माहिती शरद पवारांना दिली.

दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अत्यावश्यक सोयी-सुविधा, पुरेसे अन्नधान्य मिळण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभाग रात्रंदिवस काम करत आहे. तीन दिवसांत 28 लक्ष 61 हजार 85 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 6 लक्ष 94 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप केल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. यामध्ये सुमारे 3 लक्ष 83 हजार क्विंटल गहू, 3 लाख 01 हजार क्विंटल तांदूळ, तर 3 हजार 564 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे.  

तसंच स्थलांतरीत झालेले परंतू लॉकडाऊनमुळे अडकलेल्या सुमारे 1 लक्ष 67 हजार शिधापत्रिका धारकांनी राज्यात ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु असून राज्यातील या कालावधीत नागरिकांना अत्यावश्यक सोयी सुविधा व अन्नधान्य पुरेशा प्रमाणात मिळावे यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी