[VIDEO]: छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध

मुंबई
Updated Jul 26, 2019 | 11:01 IST

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेनंतर मुंबईत शिवसैनिकांनी बॅनर्स लावलेत. या बॅनर्सच्या माध्ममातून शिवसैनिकांनी भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध

Shiv Sainiks put up posters at night opposing Bhujbal's induction in Sena
छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध 

थोडं पण कामाचं

  • छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध
  • शिवसैनिकांनी लावले भुजबळांचा विरोध दर्शवणारे बॅनर्स
  • भुजबळांच्या घरवापसीला शिवसैनिकांनी केला विरोध
  • शिवसेना प्रवेशावर भुजबळावर भुजबळ म्हणतात...

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांचं भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरू असल्याचं दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते शिवसेना-भाजपत प्रवेश करत आहेत. गुरुवारील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करत सर्वांनाच धक्का दिला. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या येत असतानाच छगन भुजबळ यांची सुद्धा घरवापसी होणार अशा बातम्या प्रसारीत झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रात विविध चर्चांना उधाण आलं. मात्र, भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध दर्शवला आहे.

शिवसेना प्रवेशावर भुजबळ म्हणतात...

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. शिवसेना पक्ष प्रवेशावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आणि या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. छगन भुजबळ यांनी शिवसेनेत प्रवेशाच्या बातम्या म्हणजे अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे शिवसैनिकांनी भुजबळांना कडाडून विरोध केला आहे. 

बॅनरवर नेमकं आहे तरी काय?

भुजबळांना विरोध करणारी बॅनर्स शिवसैनिकांनी शिवसेना भवन परिसरात लावले आहेत. या बॅनर्सवर लिहिण्यात आलं आहे की, "केसात गजरा आणि गावभर नजरा अशा काहीतरी नावाचे पूर्वी तमाशात वग नाट्य व्हायचे त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे यांच्याशी मिळते जुळते वाटते!, उगवला दिवस की मी परत येतो... साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही आपण आहे तिथेच रहा..."

अहिर यांच्या हातावर शिवबंधन

गुरुवारी (२५ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा झटका बसला आहे. तर, अहिर यांच्या प्रवेशाचा शिवसेनेला मोठा फायदा होईल हे नक्कीच. कारण, सचिन अहिर यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. सचिन अहिर यांचा २०१४च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांनी सचिन अहिर यांचा वरळी विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता.

भायखळ्यातून उमेदवारी?

सचिन अहिर हे भायखळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं वृत्त समोर येत आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे एमआयएमचे वारिस पठाण आहेत. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कुठल्या मतदारसंघातून लढणार यावर विचारले असता त्यांनी म्हटले, कुठल्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी  द्यायची हा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जोरदार चर्चा आहे.

आदित्य ठाकरेंचा मोठा विजय होण्याची चर्चा

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी काही विधानसभा मतदारसंघांची चाचपणी सुद्धा केली होती. या मतदारसंघांमध्ये वरळी विधानसभा मतदारसंघांचाही समावेश होता. त्यामुळे जर आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवली तर सचिन अहिर यांच्या शिवसेनेचा मोठा फायदा हा आदित्य ठाकरेंना होईल आणि आदित्य ठाकरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशी चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...