Indian Currency : नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असावा, भाजप नेत्यांची मागणी

Indian Currency : भारतीय नोटांवर लक्ष्मी मातेचा फोटो असावा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. आता भाजप नेत्यांनी भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच फोटो असावा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे आणि राम कदम यांनी केली आहे

indian currency
भारतीय चलन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय नोटांवर लक्ष्मी मातेचा फोटो असावा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती.
  • आता भाजप नेत्यांनी भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच फोटो असावा
  • अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे आणि राम कदम यांनी केली आहे

Indian Currency : मुंबई : भारतीय नोटांवर लक्ष्मी मातेचा फोटो असावा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. आता भाजप नेत्यांनी भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच फोटो असावा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे आणि राम कदम यांनी केली आहे. (chhatrapati shivaji maharaj and pm narendra modi photo on indian currency bjp mla nitesh rane and ram kadam demand)

शिवाजी महाराजांचा फोटो

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल संपूर्ण जगात आदर आहे, त्यामुळे भारतीय नोटांवर महाराजांचा फोटो असावा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. शिवरायांचा फोटो भारतीय नोटांवर लागल्यास ही ऊर्जा देणारी बाब ठरेल असेही राणे म्हणाले.

अधिक वाचा : सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पंजाबी गायिका अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी

अधिक वाचा :  सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पंजाबी गायिका अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी

नरेंद्र मोदींचा फोटो

भारतीय नोटांवर नरेंद्र मोदींचा फोटो असावा अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांनी ट्विटवर चार फोटो पोस्ट करून भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, डॉ. बासाहेब आंबेडकर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असावा अशी मागणी केली आहे. राम कदम यांनी ट्विट करून म्हटले आहे की काही राजकारण्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोटांवर देवी देवतांचे फोटो असावे अशी मागणी केली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावकर या महापुरुषांमुळे सामान्यांना प्रेरणा मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याग केले असून परिश्रम करून देशाचे नाव जगात मोठे केले आहे. असे म्हणत राम कदम यांनी भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले नोटांचे फोटो पोस्ट केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी