[VIDEO]: प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या चिठ्ठीत काय मेसेज? चर्चांना उधाण

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shiv Sena vs BJP: देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना प्रसाद लाड यांनी दिलेल्या चिठ्ठीत काय होतं? अशी चर्चा सुरुय.

chief minister devendra fadnavis pc prasad lad message uddhav thackeray shiv sena bjp maharashtra government formation news marathi
[VIDEO]: प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या चिठ्ठीत काय मेसेज? चर्चांना उधाण 

थोडं पण कामाचं

 • देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
 • राजनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पत्रकार परिषद
 • शिवसेनेने नेहमीच टीका केली, आम्ही टीका करणार नाही- देवेंद्र फडणवीस
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या दर्जाची टीका शिवसेनेने केली - फडणवीस

मुंबई: राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्षाचा पेच आजही कायम आहे. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. १३व्या विधानसभेचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने फडणवीस यांना तांत्रिक बाब म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरु असताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक चिठ्ठी आणून दिली. पत्रकार परिषदेत प्रसाद लाड यांनी आणून दिलेली चिठ्ठी देवेंद्र फडणवीस यांनी वाचली आणि आपली पत्रकार परिषद सुरु ठेवली. मात्र, या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं? या चिठ्ठीत कोणाचा मेसेज होता का? असे प्रश्न आता विचारला जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सत्ता संघर्षाबाबत भाष्य केलं आहे. मी वारंवार चर्चा करण्यासाठी फोन केले मात्र, माझ्या फोनला प्रतिसाद मिळाला नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सत्तेत एकत्र असतानाही पाच वर्षे शिवसेना नेहमीच भाजपवर टीका करत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या दर्जाची टीका शिवसेनेन केली ते अत्यंत चुकीचं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला असून देवेंद्र फडणवीस यांना नवं सरकार येई पर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्यासाठी राजभवनावर गेले तेव्हा त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतरही भाजपचे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या परिषदेतील मुद्दे

 1. युती तुटली असं मी बोलणार नाही
 2. निवडणूक निकालाच्या पहिल्या दिवशी जर समसमानची भाषा असती तरी एकदा आपण विचार केला असता 
 3. राज्याच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो
 4. मला विश्वास आहे, येत्या काळात जे सरकार येईल ते भाजपच्याच नेत्रृत्वात सरकार येईल
 5. सरकार बनवण्यासाठी घोडेबाजार करणार नाही
 6. सरकार स्थापन करताना कुठल्याही प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आम्ही करणार नाही
 7. पुन्हा निवडणुका लादणं हे चुकीचे आहे
 8. राज्याला सरकार मिळालं पाहिजे 
 9. वैकल्पिक पर्याय उपलब्ध होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार
 10. दैनंदिन काम मुख्यमंत्री म्हणून करेल मात्र, कुठलीही घोषणा करता येणार नाही 
 11. राजीनामा दिल्यावर राज्यपालांनी मला नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमत्री नेमलं आहे
 12. मित्रपक्षच मोदींवर आणि आमच्यावर टीका करत असताना अशा प्रकारचं सरकार कशाला चालवायचं असं आम्हाला वाटलं होतं
 13. काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांनी जशी टीका केली नाहीये तशी टीका आपल्या मित्र पक्षांनी केल्याने आम्हाला वाईट वाटलं आहे 
 14. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मित्रपक्षाकडून टीका होण हे दुर्दैवी
 15. पंतप्रधान मोदींचं नेत्रृत्व सर्वांनीच मान्य केलं आहे
 16. टीका करणाऱ्यांच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी लक्षात आणून दिलं
 17. केंद्रात आणि राज्यात सरकारसोबत रहायचं आणि त्या पक्षावर टीका करायची हे आम्हाला मान्य नाहीये
 18. आम्ही जोडणारे लोक आहोत तोडणारे नाहीत
 19. दरी त्यांनी वाढवली आहे, आम्ही टीका करणार नाही
 20. उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजुचे लोक बोलत आहेत
 21. भाजपसोबत चर्चा करायची नाही आणि शिवसेनेसोबत चर्चा करायची हे शिवसेनेने अवलंबलेलं धोरण अयोग्य आहे
 22. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ आहे मात्र, आमच्यासोबत चर्चा करण्यास वेळ नाहीये
 23. भाजपने चर्चा थांबवलीच नाही, चर्चा शिवसेनेने थांबवली आहे
 24. मी स्वत: फोन केले मात्र, माझ्या फोनला उत्तर मिळालं नाही
 25. आम्ही शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी सुरुवात केली होती
 26. जो काही गैरसमज झाला त्यावर चर्चेतून तोडगा निघू शकतो मात्र, चर्चाच झाली नाही तर मार्ग निघणार कसा
 27. अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासमोरही अडीच वर्षे मुख्यमंत्री पद अशी कुठलीच चर्चा झाली नव्हती
 28. म्हणून दिवाळी दरम्यान अनौपचारिक चर्चे दरम्यान मी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्यासमोर काहीही चर्चा झाली नव्हती
 29. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा जो काही विषय आहे त्यासंदर्भात माझ्यासमोर कधीही अडीच वर्षांच्या विषयावर निर्णय झाला नव्हता
 30. उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं की सत्तेचे सर्व पर्याय खुले आहेत हे ऐकताच आम्हाला धक्का बसला
 31. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा काही जागा कमी आल्या
 32. जितक्या जागा लढल्या त्यापैकी ७० टक्के जागांवर विजय मिळवला
 33. राज्यातील जनतेने लोकसभेतही प्रचंड बहुमत भाजपला दिलं
 34. पाच वर्षांपैकी चार वर्षे दुष्काळाची होती
 35. गेल्या पाच वर्षांत पायाभूतची सुविधांची कामे झाली
 36. सरकार चालवत असताना मित्रपक्षांनी साथ दिली त्याबद्दल त्यांचेही आभार
 37. मुख्यमंत्री पदाच्या काळात प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार
 38. गेली पाच वर्षे राज्याची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल जनतेचे आभार
 39. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला आहे
 40. राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी