मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा नको, आम्हाला भोंगा नको

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 24, 2022 | 20:39 IST

chief minister does not want hanuman chalisa, we do not want loudspeaker : मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा नको, आम्हाला भोंगा नको; असे मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घराबाहेर  हनुमान चालिसा नको असेल तर आम्हालाही आमच्या घराबाहेर भोंग्यांवरची अजान नको. आम्हाला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

chief minister does not want hanuman chalisa, we do not want loudspeaker
मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा नको, आम्हाला भोंगा नको  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा नको, आम्हाला भोंगा नको
  • मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घराबाहेर  हनुमान चालिसा नको असेल तर आम्हालाही आमच्या घराबाहेर भोंग्यांवरची अजान नको
  • मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व मशिदींवरचे भोंगे काढून टाका नाही तर ३ मे पासून परिणाम भोगायला तयार राहा - मनसे

chief minister does not want hanuman chalisa, we do not want loudspeaker : मुंबई : मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा नको, आम्हाला भोंगा नको; असे मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर म्हणजेच मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करणार होते. पण मुख्यमंत्र्यांनी 'हनुमान चालिसा'ला विरोध केला. शिवसैनिकांनी हनुमान चालिसा पठण होऊ नये म्हणून राणा दाम्पत्याची अडवणूक केली. राणा दाम्पत्याच्या मुंबईतील घरात घुसून त्यांना घराबाहेर जाण्यापासून अडविले. पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करणार म्हणणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक केली. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घराबाहेर किंवा घराजवळ हनुमान चालिसा नको असे वाटत असेल तर सगळी सरकारी यंत्रणा त्यासाठी कामाला लागेल. मग आमच्या सारख्या सामान्यांना भोंग्यातून ऐकू येणारी अजान ऐकण्याची इच्छा नसताना भोंगे काढून टाकण्याचे काम का केले जात नाही. मशिदीच्या आत धार्मिक कार्याला आमचा विरोध नाही. पण मशिदीबाहेरच्यांना भोंग्यातून जबरदस्तीने अजान का ऐकवता, असा प्रश्न मनसेच्या संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व मशिदींवरचे भोंगे काढून टाका नाही तर ३ मे पासून परिणाम भोगायला तयार राहा, असा इशारा मनसेने दिला आहे. या इशाऱ्यावर मनसे कायम असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा नको म्हणून सरकारी यंत्रणा कामाला लागणार असेल तर आम्हाला भोंगे नकोत; असे संदीप देशपांडे म्हणाले.

मशिदींवरचे भोंगे काढून टाका. मशिदीच्या आत अजान ऐकविली जाण्याला आमचा विरोध नाही. पण भोंग्यातून मशिदीबाहेर इतरांना अजान ऐकविली जात आहे. या जबरदस्तीला विरोध असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले. 'हनुमान चालिसा'ला विरोध म्हणून सरकारी यंत्रणा राबवायची आणि सामान्यांचा भोंग्यांना विरोध आहे पण ते भोंगे काढायचे नाही, असे चालणार नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना एक आणि इतरांना दुसरा नियम असे चालणार नाही.

भारताच्या संविधानाने मुख्यमंत्र्यांनी त्यांनी काय ऐकावे याचे स्वातंत्र्य दिले आहे. या स्वातंत्र्याचा वापर करण्यासाठी ते सरकारी यंत्रणेचा वापर करत आहेत. मग भोंग्यांना काढून टाकून आम्हाला संविधानाने दिलेले स्वातंत्र्य अबाधीत राखण्याचे काम हे महाराष्ट्र शासन का करत नाही, असा प्रश्न मनसेच्या संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घराबाहेर  हनुमान चालिसा नको असेल तर आम्हालाही आमच्या घराबाहेर भोंग्यांवरची अजान नको. आम्हाला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी