MUMBAI: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिली 'या' ठिकाणी भेट

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 26, 2022 | 23:55 IST

CM shinde visited police colony: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोरिवलीमधील पोलीस वसाहतीला भेट देऊन त्यांच्या नेमक्या समस्या समजून घेतल्या. तसेच पुनर्विकासाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

chief minister eknath shinde visited the police colony at borivali
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिली 'या' ठिकाणी भेट 
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री शिंदे यांनी बोरिवलीमधील पोलीस वसाहतीला भेट दिली
  • पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित
  • तोडगा काढण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांची माहिती

CM Eknath Shinde: मुंबई: मुंबई (Mumnbai) आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस (Police) वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. याच निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी आज (२६ जुलै) बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलीस वसाहतीला अचानक भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीच्या सद्यस्थितीची पहाणी केली. (chief minister eknath shinde visited the police colony at borivali)

मुंबईतील अनेक पोलीस वसाहतींची परिस्थिती अत्यंत दयनीय असून त्यात राहणारे पोलिसांचे कुटुंबीय जीव मुठीत धरून जगत आहेत. ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन पाहिली तसेच पोलीस कुटुबीयांशी संवाद देखील यावेळी साधला. तसेच त्यांची नेमकी काय अडचण आहे हे देखील जाणून घेतलं. या पाहणी नंतर लवकरच मुख्यमंत्री शिंदे हे पोलीस वसाहतींच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

अधिक वाचा: Shivsena : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, शिंदे गटावर केले आरोप

यावेळी बोलताना पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित असून त्यावर तोडगा काढण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील आपली चर्चा झालेली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मागे याबाबत धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर या प्रश्नात पुन्हा एकदा लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. यासाठी लवकरच गृह विभागातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यासमयी बोलताना दिली.

पोलीस वसाहतींची माहिती घेतल्यावर त्यात राहणाऱ्या पोलीस कुटुंबीयांसोबत देखील त्यांनी संवाद साधला. यावेळी लवकरात लवकर तुमच्या घरांचा प्रश्न सोडवला जाईल तसेच पोलिसांच्या घरांची संख्या वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा: Uddhav Thackeray Interview : एकनाथ शिंदे यांची हाव संपतच नाही, आता ते शिवसेना गिळायला निघालेत - उद्धव ठाकरे

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनिषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार रवींद्र फाटक, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आणि संबंधित विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.

दरम्यान, आतापर्यंत अनेकदा पोलिसांच्या रहिवासी इमारतीबाबत सातत्याने समस्या समोर आल्या आहेत. मात्र, कोणत्याही सरकारने त्यावर ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकार याबाबत नेमकी कशी कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी