Vinayak Mete Death : विनायक मेटे यांच्यावर बीड येथे आज अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 15, 2022 | 07:43 IST

शिवसंग्रामचे (Shiv Sangram) नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती (Accident) मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून (Mumbai) बीड (Beed) शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं, त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. अं

Chief Minister Shinde will attend the funeral of Mete
मुख्यमंत्री शिंदे मेटेंच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात येणार
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 1 वाजता विमानाने औरंगाबादमध्ये येतील.
  • 3 वाजून 40 मिनिटांनी ते विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील.

Vinayak Mete Death : शिवसंग्रामचे (Shiv Sangram) नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती (Accident) मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून (Mumbai) बीड (Beed) शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं, त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात येणार आहे. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

विनायक मेटे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

दरम्यान, विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 1 वाजता विमानाने औरंगाबादमध्ये येतील. त्यानंतर बीडकडे रवाना होतील. 3.40 वाजता ते विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील.  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे मराठा आरक्षणाप्रश्नी बोलविण्यात आलेल्या बैठकीसाठी बीडहून मुंबईकडे निघाले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातान बोगद्याजवळ प्रवास करत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला यात मेटेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात पोहोचताच बरोबर त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

Read Also : शिवसेना शाखेच्या झेंडा वंदनाला ठाकरे गटातील सैनिकांना नोटिसा

विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात घडला. त्यानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूग्णालयात धाव घेतली. यानंतर मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेवर माझा विश्वास बसत नाहीये आहे. मराठा समाजासाठी सातत्यानं लढणारा एक नेता हरपला, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती.

Read Also : बिग बॉस-16 मध्ये येणार लॉक अप स्टार मुनव्वर फारुकी?

ट्रक आणि चालक सापडला

विनायक मेटे यांच्या फोर्ड एन्डेवेर कारला आयशर कंपनीच्या ट्रकने धडक दिली होती. DN 09 P 9404 असा ट्रकचा नंबर होता. पोलिसांनी या नंबरवरून ट्रक मालकाचा पत्ता शोधला. ट्रकचा मालक महाराष्ट्र - गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील कासा येथील रहिवासी आहे. पोलीस ट्रक मालकापर्यंत पोहोचले त्यावेळी ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाल्याची माहिती मालकाने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी ट्रक मालकाच्या मदतीनेच फरार ट्रक चालक दमणमध्ये असल्याची माहिती मिळविली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून ट्रक जप्त केला आणि ट्रक चालक उमेश यादव याला दमणमधून अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी