Uddhav Thackeray 'मान' दुखावली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 11, 2021 | 01:05 IST

Chief Minister Uddhav Thackeray hospitalised मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्यावर उपचार करुन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये असतील. मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे दुखणे बळावल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Chief Minister Uddhav Thackeray hospitalised
'मान' दुखावली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये 
थोडं पण कामाचं
  • 'मान' दुखावली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये
  • पुढील तीन दिवस हॉस्पिटलमध्ये असतील
  • दुखणे बळावल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

Chief Minister Uddhav Thackeray hospitalised । मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्यावर उपचार करुन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये असतील. मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे दुखणे बळावल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे. महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून दररोज पत्रकार परिषद घेऊन नवनवे आरोप करत आहेत. या प्रकाराला उत्तर देण्यासाठी एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका जमिनीच्या संशयास्पद व्यवहाराची माहिती जाहीर करत मलिकांना काही प्रश्न विचारले आहेत. 

याआधी महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित निवडक आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. या प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्या निकटवर्तियांची चौकशी झाली आहे. 

एनसीबी एसआयटी मुंबईतील ड्रगशी संबंधित सहा प्रकरणांचा तपास करत आहे. यापैकी एका प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर खान याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. तर अन्य एका प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत.

संप, आंदोलनं, राजकीय संघर्ष आणि गंभीर आरोप यामुळे महाराष्ट्रातील घडामोडींची दररोज चर्चा सुरू आहे. या अशा वातावरणात मान दुखावल्यामुळे मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. आता पुढील काही दिवसांत राज्यात काय होणार, यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी