मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे.जे.रुग्णालयात घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 08, 2021 | 14:51 IST

राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Chief Minister Uddhav Thackeray  second dose of vaccine taken at the j j hospital
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले आहेत
  • पहिला डोस ११ मार्च रोजी घेतला
  • पत्नी रश्मी ठाकरे तसेच मुलगा आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण

मुंबई : राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची दुसरा डोस घेतला आहे. याविषयीची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. दुपारी बाराच्या सुमारास उद्धव ठाकरे कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रुग्णालयामध्ये आले. (Chief Minister Uddhav Thackeray  second dose of vaccine taken at the j j hospital)

मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले आहेत. पहिला डोस ११ मार्च रोजी घेतला होता, त्यानंतर २८ दिवसांनी त्यांनी आज दुसरा डोस घेतला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच पुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची बाधा झाली आहे. आदित्य हे होम क्वारंटाइन असून रश्मी ठाकरेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. रश्मी ठाकरे यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २३ मार्चला रश्मी ठाकरे यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. 

दरम्यान पहिली लस घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांनी जनतेला लस घेण्यास सांगितले होते. लसीबद्दल मनामध्ये भिती आणि संभ्रम ठेऊ नका. मनात कोणतीही शंका न ठेवता लस टोचून घ्या,’ असं आवाहन उद्धव यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर केलं होतं. राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे लसींचा पुरवठा कमी पडत असून केंद्राकडून लसी मागवल्या जात आहेत. 

लसीकरणाचा चौथा टप्पा 


देशात लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारी रोजी सुरू झाला होता. पहिल्या टप्प्यात आघाडीवरील करोनायोद्धय़ांच्या लसीकरणासाठी सीरम संस्थेने उत्पादित केलेली ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. देशामध्ये १ मार्चपासून करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला. या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत वय वर्षे ६० तसेच  ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण करण्यास सुरुवात झाली. चौथ्या टप्प्यामध्ये एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी