Uddhav Thackeray :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घालताना सांगितली लाकूडतोड्याची गोष्ट 

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेसह सर्व बंडखोर आमदारांना भावनिक साद घातलाना इसाप नितीतील लाकूडतोड्याची गोष्ट सांगितली. या गोष्टीने शिवसैनिकांच्या मनात चर्रर झाले असेल. (Chief Minister Uddhav Thackeray, while making an emotional appeal, told the story of woodcutter)

Chief Minister Uddhav Thackeray, while making an emotional appeal, told the story of woodcutter
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घालताना सांगितली लाकूडतोड्याची गोष्ट   |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेसह सर्व बंडखोर आमदारांना भावनिक साद
  • इसाप नितीतील लाकूडतोड्याची गोष्ट सांगितली.
  • या गोष्टीने शिवसैनिकांच्या मनात चर्रर झाले असेल.

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेसह सर्व बंडखोर आमदारांना भावनिक साद घातलाना इसाप नितीतील लाकूडतोड्याची गोष्ट सांगितली. या गोष्टीने शिवसैनिकांच्या मनात चर्रर झाले असेल. (Chief Minister Uddhav Thackeray, while making an emotional appeal, told the story of woodcutter)

काय सांगितली उद्धव ठाकरे यांनी गोष्ट 

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तीच परिस्थिती सध्या उद्भवली आहे. काही जणांना म्हण माहिती पण त्या म्हणी मागची गोष्ट माहिती नाही आहे. ती गोष्ट अशी आहे. एकदा एक लाकूडतोड्या जंगलात झाड तोडत होता. तो झाडावर कुऱ्हाडीचे घाव घालत होता. त्या झाडावर असलेले पक्ष कासाविस झाले. की आपल्याला आसरा देणारे हे झाड तुटणार कोलमडून पडणार. पण हे घाव घातले जात असताना त्या झाडाला वेदना किती होत असतील. मग ते पक्षी त्या झाडाशी बोलायला लागले. आपल्याला निसर्गाची भाषा येत नाही. पण निसर्ग एकामेकांशी बोलत असतो. 

पक्षी झाडाला बोलत असतील, दादा तुला खूप दुखत असेल ना रे, तुला खूप वेदना होत असे ना रे. त्यावर झाडाने काय उत्तर द्यावे. मला दुःख होतं वेदना होत आहेत ते घाव पडताहेत म्हणून होत नाही. तर तो जो लाकूडतोड्या जी कुऱ्हाड वापरत आहेत. त्या कुऱ्हाडीचा दांडा हा माझ्या लाकडापासून बनला आहे. याचे दुःख मला अधिक होत आहे. 

हेच आज चालेलं आहे. कुऱ्हाडीचा दांडा हा राजकारणातील जन्मदात्री आहे. जी शिवसेना आहेत तीचे लाकूड वापरून तिच्यावर कोणी घाव घालू नका. या समोर बसा मी देतो राजीनामा, चला मी राजीनाम्याचे पत्र तयार करून ठेवले आहे. जे आमदार गायब आहेत. किंवा त्यांना गायब केले आहे. त्यांनी यावं तुमच्या हातात मी देतो राजीनामा, तुम्ही तो जाऊन राज्यपालांना द्या. मी का नाही जात, कारण मला कोव्हीड झाला आहे. त्यावरून राज्यपाल म्हणाले, की उद्धवजी का आले नाही, तर त्यावेळी मीही येण्यास तयार आहे. 

पाहा नेमका व्हिडिओ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी