CIDCO Lottery: सिडको अर्जदारांसाठी महत्वाची बातमी 

मुंबई
सुनिल देसले
Updated Oct 16, 2019 | 16:21 IST

CIDCO Nivara Kendra: शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र म्हणजे सिडकोतर्फे सदनिकांची विक्री करण्यात येते. या सदनिकांसाठी लाखो नागरिक अर्ज करतात. या अर्जदारांसाठी महत्वाची बातमी आहे.

cidco nivara kendra lottery mass housing scheme first installment payment 24 october 2019
सिडको अर्जदारांसाठी महत्वाची बातमी (फोटो सौजन्य: lottery.cidcoindia.com) 

थोडं पण कामाचं

  • सिडको अर्जदारांसाठी महत्वाची बातमी
  • सिडकोच्या सोडतीत विजेत्यांनी मुदतीत पैसे भरावे
  • सदनिकेचा पहिला हफ्ता भरण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर 

मुंबई: नवी मुंबईतील सिडकोने आपल्या महागृहनिर्माण योजने अंतर्गत घरांची लॉटरी २ ऑक्टोबर २०१८ रोजी काढली होती. या लॉटरीत विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना सिडकोतर्फे वाटपपत्र देण्यात आले असून त्यामध्ये पैसे भरण्याच्या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यानुसार विजेत्यांना आपल्या घराचा पहिला हफ्ता भरण्यासाठी २४ ऑक्टोबर २०१९ ची तारीख दिली आहे. तसेच हा पहिला हफ्ता नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे.

सिडकोतर्फे गेल्या महिन्यात वाटपपत्र (अलॉटमेंट लेटर) विजेत्यांना देण्यात आले आणि सदनिकेचे पैसे (पहिला हफ्ता) भरण्यासाठी २४ ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांनी बँकेत धाव घेऊन कर्जाची रक्कम उभी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण या सर्व प्रक्रियेला वेळ लागला आणि त्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तसेच लाभार्थ्यांना सिडकोने सांगितलेला पहिला हफ्ता हा साडे तीन लाखांपासून ते साडे चार लाखांपर्यंत आहे. हा पहिला हफ्ता ग्राहकांनाच भरावा लागणार आहे. पहिल्या हफ्त्याची रक्कम भरण्यासाठी पार्ट पेमेंट म्हणजेच दोन टप्प्यांत पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचं सिडकोतर्फे सांगण्यात आलं आहे. इतकी मोठी रक्कम कमी वेळत उभी करणं अनेकांना त्रासदायक ठरत आहे. पैसे भरण्याची मुदत २४ ऑक्टोबर आहे आणि ही मुदत वाढवण्यात येणार नसल्याचं सिडकोने स्पष्ट केलं आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान या प्रकरणी सिडकोने स्पष्ट केलं आहे की, घराच्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यातील रक्कम भरण्याची अंतिम तारीख २४ ऑक्टोबर आहे. त्यानंतर जे लाभार्थी आपले पेमेंट करतील त्यांना पहिल्या हफ्त्याच्या रकमेसोबतच दंडाची रक्कम सुद्धा भरावी लागणार आहे.

सिडकोच्या महागृहनिर्माण योजना २०१८ - १९ च्या पात्र लाभार्थ्यांना आपल्या सदनिकेचा पहिला हफ्ता २४-१०-२०१९ रोजी भरावा लागणार आहे. तसेह हा हफ्ता केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी https://cidco.maharashtra.gov.in/marketing/ या लिंकवर क्लिक करावे किंवा cidco.maharashtra.gov.in या साइटवर ऑनलाइन पेमेंट पणन महागृहनिर्माण पेमेंट या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी